खोपटेजवळ बसने दुचाकीस्वाराला चिरडले एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By Raigad Times    09-Feb-2024
Total Views |
 uran
 
उरण । खोपटे गावाजवळील अमेया कंपनी समोर एनएमएमटी बसने दिलेल्या भीषण धडकेत दोन मोटारसायकल स्वारांना व टेम्पोला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दोघेजण हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
गुरुवारी सकाळच्या दरम्यान एनएमएमटी बसने खोपटा येथे टेम्पोला धडक देत रस्त्यावरील मोटारसायकल स्वरांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका स्कुटरचे दोन तुकडे झाले. या अपघातात मोटारसायकल स्वार निलेश शशिकांत म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपटा गावातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची मागणी केली.
 
uran
 
खोपटा-कोप्रोली-चिरनेर या रस्त्यावर खोपटे गावानजीक शासकीय जागेवरच कंटेनर यार्ड बेकायदेशीर उभारण्यात आले आहेत. याची तक्रार संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे करूनही ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावरून त्यांचे आर्थिक लागेबांधे उघड होत आहे. यामुळे या भागात अपघाताची मालिका सुरू आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने सदर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
 
भरधाव बस चालकाने टेम्पोला व मोटारसायकल स्वारांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर इतर दोघेजण हे गंभीर जखमी झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना नवीमुंबई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. बसमधिल प्रवासी नागरीकांना किरकोळ दुखापत झाली आहे.
 
uran
 
यावेळी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करुन भरधाव वेगातील वाहनांना आवरण्याची तसेच वारंवार होणार्‍या अपघातात मयत, जखमी नागरिकांना भरपाई देण्याची मागणी केली. उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. या भागातील शासकीय जागेवरील अनधिकृत कंटेनर यार्ड व बांधकामे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.