वाळू माफिया यांच्याविरुद्ध शेतकर्‍याचे उपोषण

08 Feb 2024 13:41:11
 karjat
 
कर्जत । वाळूमाफिया विरोधात आंबोट गावातील स्थानिक शेतकरी जयवंत धर्मा मसणे उपोषण बसले आहेत. उपोषणाच्या तिसर्‍या दिवशी देखील उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम असून शासनाच्या वतीने वाळू माफिया यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही आणि त्यामुळे उपोषण कायम आहे.
 
कर्जत तालुक्यातील पाली पोस्ट कोतवाल खलाटी येथील नदी पात्रामध्ये वाळू काढली जात आहे. गौलवाडी हद्दीतील पेज नदी पत्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून स्थानिक शेतकरी जयवंत मसणे यांनी रीतसर पत्रव्यवहार करून तक्रार केली.तहसील कार्यालयात करण्यात आलेल्या तक्रारी नंतर भालीवडी तलाठी सजा यांच्याकडून पंचनामा करण्यात आला.
 
मात्र वाळू उपसा करणार्‍या विरुद्ध प्रशासन कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यासाठी जयवंत धर्मा मसने यांनी कर्जत तहसील कर्यालया बाहेर पाच फेब्रुवारी पासून उपोषण सुरू केले.उपोषणाचा तिसरा दिवसापर्यंत शासकीय कर्मचारी तेथे फिरकले नाहीत.
 
वाळू चोरी करणा-या बाबत अनेक वेळा प्रशासकीय यंत्रणेस कळवूनही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळू उपसा करून चोरी करणार्‍या इसमावर कुठल्याही प्रकारे कारवाई होत नसल्याने प्रशासन विरुद्ध सुरू असल्लेया उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे. उपोषणाच्या तिसर्‍या दिवस पर्यंत महसूल विभागाचा कोणताही अधिकारी उपोषणकत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहचला नाही.
Powered By Sangraha 9.0