कामोठे येथे स्कुल व्हॅनची धडक; दोघांचा मृत्यू

By Raigad Times    07-Feb-2024
Total Views |
 panvel
 
पनवेल । दारू पिऊन स्कूल स्कूल व्हॅन चालवणार्‍या वाहनचालकाने दिलेल्या धडकेत व्हॅन खाली चिरडून एका 9 वर्षिय मुलासह 50 वर्षिय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना कामोठे वसाहतीमधील जुई कामोठे गावाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. या अपघातात 1 व्यक्ती देखील जखमी झाला आहे.
 
या प्रकरणी कामोठे पोलीसांनी मद्यधुंद चालक ओमकार चव्हाण याला अटक केली आहे.आर्यन दत्ता साळवे (वय 9),मंगल बाळू रोकडे (वय 50) असे मृत झालेल्या व्यक्तींची नाव आहेत. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मंगल रोकडे तसेच आर्यन साळवे आणि त्याचे कुटूंब तसेच इतर कुटूंब हे कामोठे वसाहतीमधील जुई कामोठे गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारील फुटपाथ तसेच मोकळ्या जागेत राहत होते.नेहमीच्या दिनचर्येनुसार साळवे,रोकडे कुटूंब जेवणल्यानंतर आपल्या राहत्या झोपड्याच्या बाहेर गप्पा मारत बसले होते.
 
तर काहीजण हे रस्त्यावर फेरफटका मारत होते याच वेळी चालक दारूच्या नशेत असल्याने स्कुल व्हॅन चालकाचा ताबा सुटला आणि आर्यन आणि मंगल तसेच अन्य एका महिलेला गाडीने जोरात धडक दिली.या अपघातात दोघांचा मृत्यू झाला नधिया साळवे ( वय 20) हा सुद्धा जखमी झाला आहे.
 
ही घटना घडल्यानंतर जखमींना तत्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. मात्र आर्यनचा जागेवरच मृत्यू झाल्याचे घोषित केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तर मंगल ही उपचारादरम्यान मृत झाल्याचे सांगितले. या घटनेची सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोचून वाहनचालकला ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.
 
या वाहन चालकांवर कलम 304 (अ) नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.रस्त्यावरील पोलदेखील वाकला जुई कामोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ झालेला या अपघाताची तीव्रता एवढी भयानक होती की, अपघाताला जबाबदार असलेली स्कूल व्हॅन ही रस्त्यावरील पोलला जाऊन आढळली आणि हा पोल चक्क वाकला आहे.