खा. श्रीरंग बारणे पुन्हा ठरले संसदरत्न

20 Feb 2024 11:53:28
pimpri
 
पिंपरी । लोकसभेतील उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, खासगी विधेयक आणि अनुकरणीय सर्वोत्तम कामगिरीसाठी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने दिल्लीत गौरविण्यात आले आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खासदारांना प्राईम पॉईंट फौंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.
 
तेलंगनाच्या राज्यपाल डॉ. तमिलीसाई सौंदरराजन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते खासदार बारणे यांना 17 लोकसभेतील कामगिरीसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा, निवृत्त न्यायाधीश संजयकुमार कौल, प्राईम पॉईंट फौंडेशनचे श्रीनिवासन, प्रियदर्शनी राहुल उपस्थित होते.खासदार बारणे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम आहे.
 
त्यांनी 635 प्रश्न विचारले आहेत. 166 चर्चामध्ये सहभाग घेतला तर, 13 खासगी विधेयके मांडली आहेत. खासदार बारणे यांची सभागृहात 94 टक्के उपस्थिती आहे. या कामगिरीसाठी त्यांना संसद उत्कृष्टरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. लोकसभेच्या पीठासीन अधिकारी पदाचा बहुमान हा पुरस्कार माझा नसून मतदारसंघातील जनतेचा आहे. त्यांच्यामुळेच मी हे काम करु शकलो. त्यामुळे ही हा पुरस्कार मावळच्या जनतेला अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0