रायगड प्रेस क्लबचा श्रीवर्धन येथे पुरस्कार वितरण सोहळा

By Raigad Times    20-Feb-2024
Total Views |
 shreewardhan
 
श्रीवर्धन । रायगड प्रेस क्लबचा 19 वा वर्धापन दिन व पत्रकार सन्मान सोहळा श्रीवर्धन बीचवर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी यंदाचा आचार्य अत्रे राज्यस्तरिय संपादक पुरस्कार लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख आणि खा. सुनिल तटकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आले.
 
यावेळी समाजाचे प्रश्न मांडत शासनाला व लोकप्रतिनिधींना त्यांच्या चांगल्या वाईट कामाचा आरसा दाखवत असतानाच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणार्‍या रायगड प्रेस क्लबचा आदर्श देशातील पत्रकारांनी घ्यावा असे गौरवोदगार ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे यांनी काढले.
 
प्रमुख अतिथी रायगडचे खासदार यांनी अतुल कुलकर्णी यांच्या भाषणातील पत्रकारांशी असलेल्या प्रेम व तिरस्काराच्या नात्याचा संदर्भ देत, प्रेम असेल तर रागावण्याचा अधिकार असतो मात्र तिरस्कार वाढत गेला तर त्यातून टाकलेल्या ठिणगीतून वणवा पेटणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यावी असे आवाहन केले,.
 
shreewardhan
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष एस एम देशमुख यांनी शासन व लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामाचा आरसा दाखवत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम पत्रकारांनी करत राहावे असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाभळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, श्रीवर्धनचे मुख्याधिकारी विराज लबडे, माजी नगराध्यक्ष जीतेंद्र सातनाक आदी मान्यवर उपस्थित होते. - प्रेस क्लब सन्मान 2024 चे हे ठरले मानकरी


shreewardhan
 
यावेळी आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान दै. लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांना, प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान म्हसळ्याचे जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांना तसेच निशिकांत उर्फ नानासाहेब जोशी स्मृती जेष्ठ पत्रकारिता सन्मान अलिबाग - रेवदंड्याचे जेष्ठ पत्रकार अभय आपटे तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकारिता सन्मान येथील न्यूज 18 लोकमतच्या स्नेहल पाटकर मुंबई( रोहा)यांना गौरवण्यात आले,  रायगड प्रेस क्लबचे पुढील सन्मान पुरस्कार, प्रकाश काटतरे स्मृती निर्भीड पत्रकारिता सन्मान अलिबागचे महेंद्र दुसार यांना, दीपक शिंदे स्मृती सिनिअर व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान अलिबागचे मोहन जाधव यांना, अ‍ॅड. जनार्दन पाटील स्मृती, शोध पत्रकारिता सन्मान कर्जतचे दीपक पाटील यांना, संतोष पवार स्मृती युवा पत्रकारिता सन्मान पुरस्कार खोपोलीचे काशिनाथ जाधव यांना, डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान पुरस्कार महाडचे इलियास ढोकले यांना, प्रेस क्लब अ‍ॅक्टीव्ह जर्नालिस्ट सन्मान पुनम धुमाळ माणगाव यांना, प्रेस क्लब सामाजिक कार्यकर्ता सन्मान पेणचे सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांना तर प्रेस क्लब विशेष सन्मान श्रीवर्धनचे जेष्ठ पत्रकार विजय गिरी यांना मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
 
तर रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे सन्मान श्रीवर्धनचे संतोष रेळेकर आणि रोह्याचे रवींद्र कान्हेकर यांना देण्यात आले.या स्थानिकांचा विशेष सन्मान विशेष स्थानिक सन्मान म्हणून समाजसेवक सन्मान अली अब्दुल रज्जाक काझी यांना, कृषी सन्मान इप्तिकार शब्बीर चरफरे, उद्योजक महंमद हनीफ गफार मेमन, स्वच्छता दूत सन्मान विक्रम गायकवाड आणि दीपक धनवटे तर वृत्तपत्र वितरक सन्मान किशोर वाडिया आणि रुपेश तीताडे यांना देवून गौरविण्यात आले