नेरळमध्ये मेडिकल स्टोअर फोडणारे चोरटे गजाआड

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
 neral
 
नेरळ । नेरळ गंगानगर आणि राजेंद्र गुरूनगर भागातील मेडिकल स्टोअरमध्ये चोरीची घटना घडली होती. 87 हजारांचे सामान चोरीला गेले होते. या घटनेनंतर नेरळ पोलिसांनी जोरदार सर्च मोहीम हाती घेत दोघांना ताब्यात घेवून त्यांना गुन्ह्यात अटक केली आहे.
 
6 फेब्रुवारी रोजी रात्री नेरळ पोलीस ठाणे हददीतील गंगानगर परिसरात असलेले मोडिकल दुकान आणि कर्जत कल्याण हायवे रोडवरील साई तुलसी अपार्टमेंटमधील मेडीकल दुकाने फोडून अज्ञाताने चोरी केली होती. मेडीकल गल्ल्यामधील रोख रक्कम घरफोडी चोरी करून चोरून नेली.
 
त्याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथ स्वप्नील मधुकर लिंडाईत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होता. तर राजेंद्र गुरूनगर मेडिकल
दुकानाचे मालक असावरी गणेश पगारे यांनीही तक्रार दाखल केली होती. ही मेडीकल दुकाने हे पहाटेच्या सुमारास फोडल्याचे प्राप्त सीसीटीव्ही दुकाने मुख्य रस्त्यावर असल्याने चोरांनी पोलिसांना खुले आव्हान दिल्यासारखे होते.
 
नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. प्रतिबंधक युनिटचे अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सरगर, सहायक फौजदार किसवे, पोलीस हवालदार म्हात्रे,...
 
खंडागळे, दवणे, केकाण, पोलीस शिपाई, वांगणेकर यांनी नेरळ ते बदलापूर हायेवरील सीसीटीव्ही तसेच नेरळ, शेलू, वांगणी, बदलापूर व अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीचे प्राप्त फुटेजच्या आधारे,तसेच घटनास्थळावरील प्राप्त मोबाईल डाटाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले.
 
गोपनीय बातमीदारांच्या आधारे गुन्ह्यातील चोर निष्पन्न करून त्यांना त्यांचे घरातून ताब्यात घेतले. यापैकी एकाचे नाव रोहीत शांताराम मालुसरे (रा.बदलापूर) असे असून, दुसरा अल्पवयीन आहे.या दोघांनीही चोरीची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. अल्पवयीन मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात आल