अलिबाग पीएनपी चषक-2024 नाईट क्रिकेट स्पर्धा स्पर्धेचा महासंग्राम सुरु

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
 alibag
 
अलिबाग । अलिबागमध्ये होणारा क्रिकेट स्पर्धेचा महासंग्राम स्थानिक खेळाडूंसाठी एक वेगळी पर्वणी असणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिके असलेली स्पर्धा म्हणून खेळाडूंना एक वेगळी दिशा देणारी ठरणार आहे. या खेळातून स्थानिक खेळाडूंना हक्कांचे व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे गौरवोद्गार महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काढले.
 
स्व.प्रभाकर पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना पुरस्कृत यु. व्ही स्पोटर्स अ‍ॅकेडमी आयोजित अलिबागमधील कुरुळ येथील आझाद मैदानात 17 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत टेनिस क्रीकेट स्पर्धेचा थरार अलिबागकरांना पहावयास मिळणार आहे.या निमित्ताने पीएनपी चषक अनावरण आणि खेळाडूंचा लिलाव सोहळा कुरुळ येथील क्षात्रैक्य माळी समाज हॉल येथे मोठ्या जल्लोषात शनिवारी 10 फेब्रुवारी रोजी पार पडला.
 
यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. त्यांच्या समवेत पीएनपी इन्फ्राचे संचालक नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे माजी गटनेते, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, सासवणे सरपंच संतोष गावंड, प्रमोद घासे, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे, पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, पीएनपी एज्युकेशनचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह संघ मालक, कप्तान गावंड, प्रमोद घासे, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख प्रिती पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे सिनियर मॅनेजर संदीप जगे, पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, पीएनपी एज्युकेशनचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक आदींसह संघ मालक, कप्तान उपस्थित होते.
 
आज स्थानिक पातळीवर संघ मालकांनी लिलाव प्रक्रीयेत सहभाग घेतला आहे. भविष्यात देश, जागतिक पातळीवर होणार्या क्रीकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव करण्याची संधी प्राप्त व्हावी हीच इच्छा आहे. जेणेकरून अलिबागचे नाव एक वेगळ्या उंचीवर जाण्यावर अधिक मदत होईल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.सुपर प्लेअर्स आंबेपूर संघाचे मालक सवाई पाटील,कप्तान सुमीत भगत, जिजा अंश 11 संघाचे मालक संदेश बैकर, भुपेंद्र पाटील, कप्तान सुमेध पत्रे, ए 3 सोगाव संघाचे मालक वसिम कुर, कप्तान पराग खोत, अमृत स्पोटर्स सासवणेचे मालक दर्शन वाकडे, कप्तान सागर पाटील, त्रिशव्या 11 वरसोलीचे मालक मयुरेश सारंग,कप्तान, साहील खांबे, सुरेश काका 11 वरसोलीचे मालक सुरेश घरत, कप्तान शिरू विक, रेड हॉर्स 11 नवगावचे मालक प्रमोद घासे, कप्तान विनोद वाटकरे, अक्षय्या हॉटेल चेंढरेचे मालक आनंद पाटील, कप्तान निखील पाटील, प्रसाद 11 अलिबागचे मालक अ‍ॅड. मानसी म्हात्रे, कप्तान नागेश शिद, साईकृपा साई नगर खंडाळेचे मालक नासिकेत कावजी, कप्तान अदिल कुरेशी, 7700 जिजाऊ 11 चेेंढरेचे मालक प्रथमेश पाटील, कप्तान प्रसाद पाटील, आझाद 11 कुरुळचे मालक अवधूत पाटील, कप्तान शिवतेज पाटील,प्राणशी 11 रोहाचे मालक मयंक ठाकूर, कप्तान यश पारंगे,
मुस्कान 11 मांडलाचे मालक रिझवान फहीम, कप्तान हुसेन टक्के, 11 केतकीचामळाचे मालक अजिंक्य पाटील,कप्तान मनीष मोकल, ज्ञानी 11 नांगरवाडीचे मालक मोहन धुमाळ, कप्तान जयेश शेळके, ए.बी. ग्रुप अलिबाचे मालक कपिल अनुभवणे, कप्तान पंकज जाधव, आदिरा वॉरिअर्स कावाडेचे मालक अभिषेक पाटील, कप्तान अक्षय म्हात्रे आहेत