कर्जत महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियान

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
 karjat
 
कर्जत । कोकण ज्ञानपीठ कर्जत कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन. ’प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ’अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पोहोचविण्यासाठी घ्यावयाची दक्षता’ या विषयांतर्गत प्रात्यक्षिकासह धडे दिले.
 
डॉ.वाहिद यांनी प्रात्यक्षिकासह’अपघातग्रस्तला पुढील उपचारासाठी नेताना घ्यावयाची काळजी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.अजय कराळे यांनी, वाहन चालवताना आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपले नुकसान होतेच,परंतु कारण नसताना अन्य वाहन चालकांना नुकसान पोहचते.