माथेरानमध्ये पॉड हाऊसच्या कामाला सुरुवात

पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना स्वस्त, दर्जेदार सुविधा देण्यासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
karjat
 
कर्जत । माथेरानमध्ये जगभरातून पर्यटक येऊ लागले आहेत. वर्षाला साधारण 15 लाख पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना स्वस्त आणि दर्जे दार सुविधा देण्यासाठी आता मध्य रेल्वेने पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी पॉड हॉटेल्स थंड हवेच्या ठिकाणी पॉड हॉटेल्स सुरू करण्यात येणार आहेत.
 
रेल्वे हा प्रकल्प उभारणार असून अतिशय किफायतशीर दरामध्ये माथेरानमध्ये मुक्काम करता येऊ शकतो. माथेरान या पर्यटन स्थळी वर्षातील बाराही महिने पर्यटकांचा राबता असतो. पर्यटनासाठी येथील सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याची अनेक पर्यटकांची इच्छा असते.
 
मात्र येथील निवास व्यवस्था ही सर्वसामान्य पर्यटक यांच्यासाठी खर्चिक असते.मध्य रेल्वे या ठिकाणी पॉड हटिल आणि स्लीपिंग पॉड प्रकल्प सुरु करणार असल्याने पर्यटांकाना दिलासा रायगड जिल्ह्यातील माथेरान हे देणारे ठरणार आहे.मध्य रेल्वेचे माध्यमातून मुंबई सेंट्रल कडून पॉड हॉटेल उभारणार आहे.
 
पर्यटन हंगामात माथेरान आलेल्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था नाही मग ते रस्त्याच्या बाजूला फुटपाथवर किंवा स्टेशन वरील मोकळ्या जागेत रात्र काढताना दरवर्षी पर्यटन हंगामात दिसून येत असते.त्यामुळे माथेरान मध्ये आलेल्या कोणत्याही पर्यटकाला राहायला जागा मिळाली नाही म्हणून स्टेशनवर थांबायची वेळ येऊ नये यासाठी मध्य रेल्वे कडून पॉड हॉटेल अतिशय उपयुक्त ठरणार आहे.
 
त्या पॉड हाऊस मध्ये एका छोट्या कुपी किंवा कॅप्सूल प्रमाणे आपल्याला बसण्यासाठी,झोपण्यासाठी आणि आराम करण्याची व्यवस्था या पॉड मध्ये असणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलिशान पॉड हॉटेल आणि स्लीपिंग पॉड उभारण्यात आले आहेत.
 
त्यानुसार मध्य रेल्वेने माथेरानमध्ये मोठा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संबंधात नियोजनही झाले आहे. 25 सप्टेंबरला या पॉड प्रकल्पाच्या उभारणीसाठी ऑनलाइन निविदा काढण्यात येणार आहे.प्रस्तावित स्लीपिंग पॉड्स आणि पॉड हॉटेलमध्ये सर्व आवश्यक आणि आधुनिक सुविधा ठेवण्यात येणार आहेत.
 
परवानाधारकांना माथेरानला स्लीपिंग पॉड, स्विस कॉटेज तंबू अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या तंबू खोल्या, घर किंवा कॉटेज विकसित करण्याची परवानगी दिली आहे.या पॉड हॉटेलमध्ये उत्तम वातानुकूलित निवास पॉड हॉटेलमध्ये मोबाइल चार्जिंग सुविधा, लॉकर रूम सुविधा, फायर अलार्म, इंटरकॉम, डिलक्स टॉयलेट आणि बाथरूम आदी सुविधा आहेत.
 
या पॉड्सचे बुकिंग फिजिकल मोड तसेच मोबाइल अ‍ॅपवर ऑनलाइन करण्याची व्यवस्थाराहणार आहे.हे हॉटेल माथेरानमध्ये असलेल्या रेल्वे जागेत असलेल्या 758.77 चौरस मीटर जागेवर हे पॉड हॉटेल उभारण्यात येणार आहेत.सीएसएमटी आणि मुंबई सेंट्रल स्थानकावरील पॉड हॉटेलपेक्षा माथेरान मधील हा प्रकल्प तिप्पट मोठा असणार आहे.
 
यामध्ये शंभर पेक्षा जास्त पॉड्स असतील. तसेच सिंगल पॉइस,दुहेरी पॉड्स आणि फॅमिली पॉड्स अशा स्वरुपात हे पॉड हॉटेल असतील.स्थानकावरील स्लीपिंग पॉड्सचा विकास आणि संचालनाची जबाबदारी आणि त्यासाठीचा संपूर्ण खर्च परवानाधारकाद्वारे उचलला जाणार आहे.