इंस्टाग्रामवर ओळख...नंतर केली हत्या!

गाडी, दागिने घेऊन पळताना सुधागडात अटक

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
pali
 
पाली/बेणसे । इंस्टाग्रामवरील ओळखीनंतर गोवा फिरायला गेलेल्या 22 तरुणीने 77 वर्षीय वृद्धाची हत्या करत त्याची गाडी आणि दागिने घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र नवी मुंबई गुन्हे शाखेने पाली पोलिसांच्या मदतीने सुधागडातील परळी येथून या तरुणीसह दोघांना अटक केली आहे.
 
उत्तर गोवा येथील पोरवोरीम येथील निम्स बादल यांची या 22 वर्षीय तरुणीसोबत इन्स्टाग्राम या सोशल मीडियामार्फत ओळख झाली होती. या ओळखीमुळे निम्स बादल यांनी तिला गोवा फिरण्यासाठी आमंत्रण केले होते. ती तरुणी, तिचा सहकारी आणि त्यांचा मित्र कुणाल (रा. भोपाळ,मध्यप्रदेश) असे तिघे जण उत्तर गोवा येथील मध्यप्रदेश) असे तिघे जण उत्तर गोवा येथील निम्स बादल यांच्याकडे गेले होते.
 
तेथून त्यांना आण्यासाठी निम्स बादल यांनी गाडीची व्यवस्था केली होती.या सर्वांची राहण्याची व्यवस्था निम्स बादल यांनी त्यांच्या राहत्या व्हीला (बंगल्यात) केली होती. सदर व्हिलामध्ये असताना रात्रीच्य सुमारास निम्स बादल यांनी या तरुणीसोबत
गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला.
 
यातून झालेल्या वादात या तरुणीने तिच्या सोबत असलेल्या दोन साथीदारांसह निम्स बादल यांचा खून केला व त्यांची फॉर्च्युनर कार, अंगावरील दागिने व मोबाईल फोन असा एकूण 47 लाख 82 हजारांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला.गोव्यातून ते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आले होते.
 
याची माहिती वाशी,नवी मुंबई येथील गुन्हे शाखा, कक्ष1चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सचिन बाराते, पोलिस हवालदार बालाजी चव्हाण,पोलीस हवालदार सुमंत बांगर,पोलिस हवालदार विश्वास भोईर यांचे पथक तयार केले.
 
पाली पोलिसांच्या मदतीने या पथकाने परळी येथून त्या तरुणीसह 32 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. हे दोघेही भोपाळ मध्यप्रदेश येथील राहणारे असून, त्यांच्याकडून बादल यांची फॉर्च्युनर कार, अंगावरील दागिने व मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.