खारफुटीच्या संवर्धनासाठी मदतीचा हात

सीवूड दारावे येथे स्वयंसेवकांकडून ‘खारफुटी’ स्वच्छता अभियान

By Raigad Times    12-Feb-2024
Total Views |
new panvel
 
नवीन पनवेल । रयत शिक्षण संस्थेचे, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी-नवी मुंबई येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी 11 फेब्रुवारी 2024 रोजी खारफुटीच्या संवर्धनासाठी मदतीचा हात व जागतिक पर्यावरण सुरक्षिततेसाठी हातभर लावला. सीवूड दारावे येथे या स्वयंसेवकांनी खारफुटी स्वच्छता अभियान राबविले.
 
मॅनग्रोव्ह हे जगातील सर्वात प्रभावी कार्बन सिंक आहेत, जे हवामानात बदल कमी करण्यास मदत करतात. त्यांचे पर्यावरणातील महत्व लक्षात घेत, मॅनग्रोव्ह सोलजर एनवायरनमेंट लाईफ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीवूड (दारावे) येथे शिवजन्मोत्सव सोहळा या अंतर्गत खारफुटी स्वच्छता मोहीम राबवली
खारफुटी म्हणजे काय ?
खारफुटी म्हणजेच मॅनग्रोव्ह हे एक झुडूप किंवा झाड आहे जे प्रामुख्याने किनारपट्टीवरील खारट किंवा खार्‍या पाण्यात वाढते. खारफुटी विषुवृत्तीय हवामानात वाढतात, विशेषत: किनारपट्टी आणि भरती-ओहोटीच्या नद्या. अतिरिक्त ऑक्सिजन घेण्यासाठी आणि मीठ काढून टाकण्यासाठी त्यांच्याकडे विशेष अनुकूलता आहे, ज्यामुळे बहुतेक झाडे मारली जातील अशी परिस्थिती त्यांना सहन करण्याची परवानगी देते.
 
अशा या खारफुटीच्या संवर्धनासाठी महाविद्यलयातील राष्ट्रीय योजनेच्या स्वयंसेवकांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित स्वच्छता उपक्रमांतर्गत सीवूड दारावे येथे खारफुटी स्वच्छता मोहीम राबवली. सदर उपक्रमात 35 स्वयंसेवकांनी सहभाग दर्शवला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शुभदा नायक, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी आणि चेअरमन डॉ. एल.व्ही. गवळी, प्रा.अमित सुर्वे आणि नवी मुंबई विभाग समन्वयक डॉ.पी.जी.भाले यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हर्ष झंके आणि रितुजा हेमले यांनी केले.