दोन दिवसात उद्धव ठाकरेंच्या सहा जाहीर सभा

रायगडात आज शिवसेनेची तोफ धडाडणार

By Raigad Times    01-Feb-2024
Total Views |
roha
 
रोहा । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा झंझावात अख्ख्या रायगड जिल्ह्यात धडकणार आहे. रायगड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती सभा घेणार आहेत.आज 1 फेब्रुवारी रोजी रोह्यात होणार्‍या सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.
 
रोह्यात होणार्‍या सभेमुळे शिवसैनिकांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला असून शहरात व तालुक्यातील वातावरण भगवामय झाले आहे. ठाकरे विरोधकांचा कशाप्रकारे समाचार घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पेण, अलिबाग, रोहामध्ये आज या सभा होत आहेत.
 
त्यामुळे ही सर्वच शहरे भगवामय झाली आहे, चौकाचौकात उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या असून ठिकठिकाणी भगवे झेंडे आणि पताका लावल्या आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या उरुस मैदानावर प्रचंड उत्साह व जल्लोषाच्या वातावरणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष होणार आहे.
 
roha
 
उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी रोहेकर सज्ज झाले असून या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.फुटीर आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांचा अन्यायकारक निवाडा, हिंदूत्व आणि त्या अनुषंगाने भाजपाला उत्तर देण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्यात सहा झंझावाती आणि मॅरेथॉन सभा घेत आहेत.
 
लोकसभा निवडणूक प्रचाराला या दौर्‍याने सुरूवात होणार आहे. या दौर्‍याच्या निमित्ताने प्रशासन आणि पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.रोह्यात सभा यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुका प्रमुख महादेव साळवी, संजय भोसले, विभाग प्रमुख नितीन वारंगे, शाखा प्रमुख निलेश वारंगे,कुलदीप सुतार, हर्षद साळवी, महिला तालुका संघटक नीता हजारे, शहर संघटक समिक्षा बामणे, युवा तालुका अधिकारी राजेश काफरे, विभाग प्रमुख संतोष खेरटकर, सचिन फुलारे, अनिष शिंदे,मजहर सिद्दीकी, मुझम्मिल येरूणकर,समीर डाखवे, भारत वाकचौरे, मनोज लांजेकर, अनिष शिंदे, आनंद भुवड,आदित्य कोंढाळकर, प्रेरित वलीवकर,इरफान दर्जी, दुर्गेश नाडकर्णी, राम महाडिक, विष्णू लोखंडे, नंदकुमार बामुगडे, ओमकार गुरव, अमित कासट,मनोज तांडेल, मंगेश पवार, शंकर मिलगिरे, हरेश जाधव आदी परिश्रम घेत आहेत.