मनसेकडून श्रीवर्धनमध्ये फैझल पोपेरे यांना उमेदवारी

28 Oct 2024 13:19:38
 goregoan
 
गोरेगाव | श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फैझल पोपेरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. फैझल पोपेरे हे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून याआधी काँग्रेसकडून बॅरिस्टर ए. आर. अंतुले, जनता पार्टीचे अब्दुल शकुर उकये यांनी अल्पसंख्यांक समाजाचे उमेदवार दिले होते.
 
श्रीवर्धनमधून फैझल पोपेरे यांचे नाव जाहीर झाल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक लढण्याची संधी दिल्यामुळे फैझल पोपेरे यांनी आभार व्यक्त केले आहेत. जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख तथा जिल्हा सचिव अमोल पेणकर यांनीही त्यांच्या विजयासाठी पराकाष्टा केली जाईल, असे म्हटले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0