पाऊस देणार उघडीप, राज्यात लवकरच थंडीचा प्रवेश होणार

25 Oct 2024 17:48:04
 MUMBAI
 
मुंबई | यंदा निर्धारित वेळापेक्षा काहीसा आधीच राज्यात धडकलेला मान्सून आता मात्र राज्याचा निरोप घातना दिसला.असले तरीही पूर्वोत्तर मान्सूनची माघार म्हणजे महाराष्ट्रातील पावसाचा निरोप असे म्हणणे योग्य नसेल. कारण, अद्यापही मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकणातही पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींची शयता वर्तवण्यात आली आहे.
 
बहुतांश भागांमध्ये शेतांमधील पिके आता कापणीसाठी तयार असतानाच पावसाची हजेरी मात्र अडचणींमध्ये भर टाकताना गिसत आहे. पुढील २४ तासांमध्ये राज्यातील हवामानात फारसा बदल होणार नसून, दिवसभर ऊन आणि सायंकाळनंतर पावसाची शयता बहुतांश भागांमध्ये वर्तवण्यात आली आहे. एकिकडे हलया पावसाची शयता असतानाच येत्या काळात मात्र हा पाऊस खर्‍या अर्थी उघडीप देणार असून,त्यानंतरच थंडीचा राज्यातप्रवेश होणार आहे.
 
सातारा, सांगलीसह विदर्भातही पुढील तीन ते चार दिवसांमध्ये गुलाबी थंडीची सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. दरम्यानच्या काळात किमान आणि कमाल तापमानात चढ-उतार होण्याचीही चिन्हे आहेत.ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनार्‍याच्या दिशेने पुढे येणारे ‘दाना’ चक्रीवादळ आता लँडफॉलसमयी आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देत हवामान विभागाने सर्वांनाच सतर्क केले आहे.
 
यावेळी वार्‍याचा वेगताशी १०० ते १२० किमी इतका असून, यामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याची शयता आहे. शिवाय ओडिशापासून प. बंगालपर्यंत पावसाची जोरदार हजेरीसुद्धा असेल असा अंदाज आहे. महाराष्ट्रावर या वादळाचा थेट परिणाम होणार नसून, राज्यात येऊ घातलेल्या हिवाळ्यावर, गुलाबी थंडीवरही वादळाची वक्रदृष्टी नाही हेच आता स्पष्ट होत आहे.
 
चक्रीवादळ किनार्‍यावर धडकल्यानंतर स्थानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असा स्पष्ट इशारा असल्यामुळं सध्या या भागात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रत्येक गोष्टीवर लक्ष देताना दिसत आहे. तिथे दक्षिण भारतामध्येही तामिळनाडूतील किनारपट्टी क्षेत्र काहीअंशी वादळामुळे प्रभावित होऊ शकते, पण याचीची शयता कमीच आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0