मंत्री अदिती तटकरे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार

By Raigad Times    24-Oct-2024
Total Views |
 mangoan
 
माणगाव | श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून मंत्री अदिती तटकरे उद्या, २५ ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या निवडणुकीत १ लाखाचे मताधिक्य घेऊन त्यांना निवडून आणू, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी व्यक्त केला आहे.
 
अदिती तटकरे या दुसर्‍यांदा निवडणुकीच्या रिंगणात उरतल्या आहेत. त्यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ.भरत गोगावले, मुश्ताक अंतुले, खासदार धैर्यशील पाटील, अनिकेत तटकरे, सतीश धारप उपस्थित राहणार आहेत.
 
सकाळी १० वाजता श्रीवर्धन उपविभागीय कार्यालयात त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी श्रीवर्धन मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.