बेलापूर मतदारसंघात, संदीप नाईकांच्या बंडामुळे महायुती अलर्ट मोडवर

24 Oct 2024 19:52:05
 new mumbai
 
नवी मुंबई | बेलापूर मतदारसंघात भाजपचे जिल्हाध्यक्ष संदिप नाईक यांनी पक्षाला सोडचिट्ठी देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे महायुती अलर्ट मोडवर आली आहे. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना निवडून आणण्याठी कुठल्याही प्रकारची हयगय होऊ नये, अशा सूचना महायुतीच्या नेत्यांनी दिल्या असल्याची चर्चा आहे.
 
बेलापूर मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. संदीप नाईक यांनी मंगळवारी शरदपवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाईक आता महाआघाडीकडून निवडणूक लढणार आहेत.
 
त्यामुळे येथे मंदा म्हात्रे विरुध्द संदीप नाईक अशी लढत होण्याची शक्यता आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघातुन शिंदेसेनेचे उपनेते विजय नहाटा यांनाही या मतदारसंघातुन तुतारी घ्यायची होती. मात्र संदीप नाईक यांनी ‘तुतारी’ घेतल्यामुळे सगळे राजकीय संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे म्हात्रे यांना विजयी करण्यासाठी महायुतीचे नेते एकवटू लागले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0