नवीन पनवेल | कॉलेजला जाणार्या अठरा वर्षीय तरुणाला रेल्वेची धडक लागल्याने झालेल्या अपघातात रितेश जयदास मुंडकर (राहणार बंबावीपाडा, पोस्ट वहाळ) याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ ऑटोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास रितेश जयदास मुंडकर हा कॉलेजला जात होता.
यावेळी बंबावीपाडा रेल्वे ट्रॅक जवळ बस स्टॉपला जाणार्या रस्त्यावर पनवेलच्या ट्रॅकवर मालगाडी जात होती. यावेळी उरणसाठी एक मालगाडी गेली.
यावेळी रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना पनवेलकडे जाणार्या रेल्वेची धडक रितेश मुंडकर याला लागली.या अपघातात रितेश मुंडकर हा गंभीर जखमी झाला. त्याला गांधी हॉस्पिटल, पनवेल येथे दाखल करण्यात आले. डॉटरांनी त्याला मृत घोषित केले.