रायगड जिल्ह्यात पोपटीचा नवा ट्रेंड.....

र्यटकांचा खाडीच्या भरलेल्या चिंबोर्‍या अन् म्हावर्‍यावर ताव

By Raigad Times    09-Jan-2024
Total Views |
 pali
 
पाली /बेणसे । रायगड जिल्ह्यात लज्जतदार पोपटी पार्ट्यांची सुरुवात झाली आहे. वालाच्या शेंगा व चिकनची पोपटी सर्वांनाच माहिती आहे. मात्र, भरलेल्या खार्‍या चिंबोर्‍या, कोलंबी आणि मासे यांची अनोखी लज्जतदार पोपटी खाल्लेय का कधी? सध्या रायगड जिल्ह्यात या पोपटीचा ट्रेंड सुरू आहे.
 
आणि या अनोख्या पोपटीची मागणीदेखील खूप आहे. मी बेलपाडकर या युट्युब चॅनलचे निर्माते गणेश कोळी यांनी सांगितले की, याला खाडीतील पोपटी नाव दिले आहे. खाडीतून पकडलेल्या ताज्या चिंबोर्‍या, फंटूस किंवा इतर कोणतेही मासे आणि मोठ्या कोलंब्या या पोपटीत टाकल्या जातात.
 
यासाठी विशेष स्थानिक म सालासुद्धा वापरला जातो. तसेच, वालाच्या शेंगांबरोबरच तूर व मटारच्या शेंगा देखील टाकल्या जातात. ही अनोखी पोपटी ठराविक लोकच चांगल्या प्रकारे बनवतात, त्यासाठी विशेष तयारी देखील करावी लागते.
या साहित्याचा करा वापर
गावठी वालाच्या टपोर्‍या शेंगा, मटार व तुरीच्या शेंगा. भरलेल्या खाडीच्या चिंबोर्‍या, फंटूस मासे,मोठ्या किंवा मध्यम आकाराच्या चिंबोर्‍या, स्थानिक मसाला. जाडे मिठ व भामरुडीचापाला,अ‍ॅल्युमिनियम फॉईल आणि हे सर्व जिन्नस शिजविण्यासाठी पत्र्याचा डब्बा व जळणासाठी लाकूड, पेंढा इत्यादी.
पारंपरिक पोपटी पेक्षा वेगळी
खाडीतील पोपटी थोडी वेगळी असते,पत्र्याच्या डब्यात भामरुडाच्या पाला टाकून त्यावर वाल, तूर व मटारच्या शेंगा टाकल्या त्यावर वाल, तूर व मटारच्या शेंगा टाकल्या जातात. त्यावर मीठ पसरले जाते, त्यानंतर केळीचे पान ठेवून मसाला लावलेल्या चिंबोर्‍या ठेवल्या जातात.
 
त्यानंतर पुन्हा केळीचे पान ठेवून मसाला लावलेल्या कोलंब्या ठेवल्या जातात. त्यावर केळीचे पान ठेवून त्यावर वाल, तूर व मटारच्या शेंगा टाकल्या जातात आणि त्यावर भामरुडाच्या पाला टाकून पत्र्याचे झाकण नीट बंद केले जाते. 35 ते 40 मिनिटांमध्ये खाडीतली पोपटी आणून तयार होते.