राज ठाकरेंनी अ‍ॅम्ब्यूलन्सचा मार्ग मोकळा करुन दिला

By Raigad Times    08-Jan-2024
Total Views |
 KHALAPUR
 
खालापूर । खालापूर टोल नाक्यावर तासन तास गाड्या ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. राज ठाकरे यांनी तासनतास अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवले पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर अचानक टोलनाक्यावर उतरले.
 
टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटर रांगा लागल्या होत्या.ट्रॅफिक जाम पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: हातात घेतली आणि गाड्या सोडून दिल्या. त्यामुळे अडकलेल्या अँम्बुलन्सचा रस्ता मोकळा झाला. राज ठाकरे स्वत: उतरल्याचं पाहून कॉन्ट्रॅक्टरची तारंबळ उडाली होती.
 
त्यावेळी राज ठाकरेंनी अधिकार्‍यांना तंबी देखील दिली. टोलनाक्यावर निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टर टोल घेण्यात व्यस्थ होते. मात्र, तिथंच अँब्युलन्स उभी होती, हे त्यांना दिसलं नाही. राज ठाकरे यांनी स्वत: चालत पुढं गेले अन् गाड्या सोडल्या. तुम्ही पैसे कमवण्यासाठी नाही. सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी आहे, असं मनसे नेते अविनाश अभ्यांकर यांनी म्हटलं आहे.