मनोज जरांगे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे घेणार दर्शन

By Raigad Times    30-Jan-2024
Total Views |
 mahad
 
महाड । मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे आज (दि.30) रायगडावर जावून छत्रपती शिवाजी महाराजाच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.सरकारने मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना जारी केली. नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रस पीत जरांगेंनी त्यांचे आंदोलन स्थगित केले होते.
 
मराठा आरक्षणाची अधिसूचना जारी करताना सगेसोयर्‍यांचा मुद्दा समाविष्ट केल्याने जरांगेंनी लढाई जिंकल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कृतज्ञतेची भावना म्हणून जरांगे हे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी येणार आहेत.
 
मंगळवारी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळी नतमस्तक होणार आहेत. यानंतर ते जिल्ह्यातील कर्जत, खालापूरसह अन्य तालुक्यात जरांगे समर्थकांना भेटणार आहेत.