अलिबाग येथे सतिश धारप डायलेसिस सेंटर सुरु

मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

By Raigad Times    29-Jan-2024
Total Views |
mahad
 
महाड । कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचा सामाजिक उपक्रम असलेल्या कमळ सेवा संस्था संचालित सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटरचे शनिवारी (दि. 27) उद्घाटन करण्यात आले. श्रीबाग नं. 2 - अलिबाग येथे श्री. सतिश वासुदेव धारप डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेा विभाग कोकण प्रांत प्रमुख विवेक भागवत, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, सतिश धारप, स्वयंसेवक संघ रायगड जिल्हा संघचालक रघुजी आंग्रे, जिल्हा अध्यक्ष धैर्यशिल पाटील, भाजपा उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, रायगड जिल्हा सरचिटणिस अ‍ॅड. महेश मोहिते, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटमशेठ, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा हेमा मानकर, वैकुंठ पाटील आदि उपस्थित होते.
 
सेवा हा संघाच्या विचारांचा मुळ गाभा आहे. त्यामुळे आपली संख्यांत्मक कितीही वाढ झाली तरी विचारांंचा आदर्श ठेवून काम केले पाहिजे. सेवा कार्य सुरू ठेवले पाहिजे. कमळ नागरी सहकारी पंतसंस्था संघाच्या विचाराने काम करत आहे. आर्थिक क्षेत्रात काम करत असताना सेवा कार्य देखील करत आहे, असे रविंद्र चव्हाण म्हाणाले.
 
mahad
 
तिश धारप डालेसिस सेंटरमध्ये केवळ तांत्रिकता असता कामा नये. येथे उपचारासाठी येणार्‍या रूग्णांना सेवाभाव दिसला पहिजे. आरोग्य सेवेच्या माध्यमातून मनुष्यसेवा करण्याची संधी या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे या केंद्राचे व्यावसायिक केंद्र होणार नाही याची खबरदारी घ्यावी. तसेच उपचार देत असताना किडनीचे आजार होऊ नये यासाठी जनजागृती करावी असे विवेक भागवत म्हणाले.
 
कमळ पतसंस्थेचा विकास होत आहे त्यात आम्हाला सोबती व्हायला मिळाले याचा आनंद आहे. ही संस्था सहकाराबरोबरच सामाजिक कार्य देखील करत आहे. या सेवा घेणार्यांचे आशीर्वाद त्यांना मिळणार आहेत. या संस्थेचा आदर्श इतर संस्थांनी घेतला पाहिजे, असे आ.प्रशांत ठाकूर म्हणाले.
 
रामशेठ ठाकूर परिवारातर्फे सतिश धारप डायलेसिस सेंटरला 11 लाख रूपये देणगी दिली जाईल, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जाहीर केले.हे डायलेसिस सेंटर अलिबागमध्ये सुरू झाले आहे तसे ह्दय विकारावर उपचार करणारे केंद्र रागयड जिल्ह्यात सूरू व्हायला पाहिजे, अशी इच्छा सतीश धारप यांनी व्यक्त केली.
 
अलिबागमध्ये डायलेसिस सेंटर सुरू करून कमळने एक चांगले काम केले आहे, असे आमदार जयंत पाटील म्हणाले, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले. कमळ सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेश प्रधान यांनी स्वागत केले.