पनवेल शहरात दोन गटात वाद, एकावर शस्त्राने हल्ला

24 Jan 2024 13:56:46
panvel
 
नवीन पनवेल । पनवेल शहरातील कच्छी मोहल्ला येथे दोन गटात वाद झाल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. यावेळी पनवेल शहर पोलीस, रॅपिड ऍक्शन फोर्स, दंगा काबू नियंत्रण पथक आदी बंदोबस्त नेमण्यात आला आहे. येथील काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
पनवेल शहरात 22 जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बाईक रॅली निघाली होती. बाईक रॅली कच्छी मोहल्ला परिसरात आली असता या ठिकाणी घोषणा का देता यावरून बाईक स्वाराना अडवण्यात आले. यावरून दोन गटांमध्ये वाद सुरू झाले. या वादातून एकाच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. दरम्यान यात दोघेजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
 
जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कच्छी मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0