उरण शहरात निघाल्या भव्य शोभयात्रा

By Raigad Times    23-Jan-2024
Total Views |
alibag 
 
उरण । अयोध्येतील राम मंदीर प्राणप्रतिष्ठापणा कार्यक्रमाच्या निमित्ताने उरण शहरातील राम मंदीर चौकातून काल सोमवारी उरण मधील नागरिकांनी निनादात शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
 
या मिरवणुकीची सुरुवात गणपती चौक ते स्वामी विवेकानंद चौक, कामठा मार्ग, पालवी रुग्णालय, बालई मार्गे जारीमरी मंदीर, बाजारपेठ मार्गे पुन्हा गणपती चौका पर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली.
 
alibag
 
या मिरवणुकीतमहिला, लहान मूल, जेष्ठ नागरिक यांच्यासह तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या राम घोषात निघालेल्या शोभायात्रेचे उरणच्या नागरिकांनी ठीक ठिकाणी रांगोळी, पुष्प वर्षाव करीत स्वागत करण्यात आले.
 
तर महिला आणि तरुणांनी राम धुनिवर नृत्य करीत आपला आनंद व्यक्त केला. तर उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, आवरे, फुंडेसह संपूर्ण तालुक्यातील प्रभू रामाचा जयघोष दुमदुमत होता.