बेकायदा शस्त्रे बाळगल्या प्रकरणी दोनजण अटकेत

By Raigad Times    20-Jan-2024
Total Views |
 tala
 
तळा । विनापरवाना ठासणीची बंदूक बाळगल्या प्रकरणी तळा तालुक्यातील निगुडशेत येथील दोघांना अटक केली आहे. पांडुरंग बाळाजी मंचेकर आणि प्रतिक देवजी सरफळे अशी त्यांची नावं आहेत. गुरांचे गोठ्यात त्यांनी ही बंदुक लपवून ठेवण्यात आली होती.
 
स्वता:चे फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीर वरील वर्णनाच्या ठासणीची बंदुका व त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे व उप विभागीय पोलीस अधिकारी पोंदकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहा.पो.निरीक्षक जी व्ही.कराड करीत आहेत.