मुंबई-रायगडमधील अंतर झाले आणखी कमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल सेतू’चे उद्घाटन

By Raigad Times    13-Jan-2024
Total Views |
panvel
 
पनवेल । मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतू खुला झाल्याने मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर आता दोन तासांवरून 20 मिनिटांवर आले आहे. शिवडीहून न्हावा शेवा अवघ्या काही मिनिटात गाठणे सुलभ होणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
 
मालवाहतूकही जलद होणार असल्याने उद्योगधंदे, व्यापार्‍यांचाही फायदा होणार आहे. त्यामुळे हा अटल सेतू राज्याच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई ट्रान्सहार्बर लिंकचे उद्घाटन शुक्रवारी पार पाडले. पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी शिवडी-न्हावा शेवा असा प्रवास केला.
 
यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.मुंबईला रायगडमधल्या उरण तालुक्याशी जोडण्यासाठी उभारण्यात आलेला शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू आज नागरिकांसाठी खुला झाला. या मार्गावर एकेरी प्रवासासाठी अडीचशे रुपये टोल आकारण्यात येणार आहे.
अटल सेतूवरील टोल दर किती?

panvel