मंडणगड पन्हळी येथील आंबा, काजूच्या बागेला आग ;शेकडो झाडे जळून खाक, बागायतदाराचे मोठे नुकसाना

By Raigad Times    10-Jan-2024
Total Views |
madgoa
 
मंडणगड । तालुक्यातील पन्हळी बुद्रुक येथील एका आंबा-काजूच्या बागेला अचानक आग लागल्यामुळे शेकडो झाडे जळून गेली आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही मात्र सुमारे तिन लाख रुपयांचे नुकासान बागायतदार शेतकर्‍याचे झाले आहे.पन्हळी येथील बागायतदार सुरेश विश्राम बोथरे यांची केतकवणेचा खोडा येथे आंबा, काजूची साडे तिनशे झाडांची झाडे आहेत.
 
नुकतेच झाडाना मोहर येण्यास सुरुवात होण्यास सुरुवात होणार होती. मात्र या बागेला आग लागून सर्व झाडे जळून गेली.पन्हळी येथील रहिवासी पांडूरंग दुर्गवले हे त्या परिसरात गुरे चरवण्यासाठी गेले असता, त्यांच्या हे निर्दशनास आले. त्यांनी ताबडतोब बागेचे मालक सुरेश बोथरे यांना दुरध्वनीवरुन संपर्क करुन घडलेली घडना सांगितली. त्यावेळी बोथरे हे मुंबईला गेले होते.
 
madgoa
 
बागेत आग लागून झाडे होरपळून गेल्याचे कळताच त्यांना धक्का बसला.पन्हळीला आल्यानंतर बोथरे यांनी गावातील दोघांना घेवून बागायतीकडे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांना मोठा धक्का बसला. बागेतील सुमारे साडे तिनशे आंबा काजूची झाडे जळून खाक झाली होती.
 
आगीमुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहेच, परंतू ही बागा पुन्हा उभी करणार कशी? असा सवाल बोथरे यांच्यासमोर आहे.
बागायत जळून गेल्यामुळे शासनाने नुकसान भरवाई द्यावी अशी मागणी बोथरे यांनी केली आहे. तसेच ही आग कोणी लावली याचा तपासदेखील करण्यात यावा अशी विनंती त्यांनी बाणकोट पोलीसांना केली आहे.
 
दरम्यान, डोंगरभागात अलिकडे आगी लागण्याच्या घटना घडत असतात, शेतीशी संबध नसलेले लोक स्वस्तामध्ये जागा घेतात आणि फळबागा तयार करतात मात्र जागा साफ सफाईसाठी माणसं न लावता आग लावण्याचा शॉर्टकट घेतात आणि अशा घटना घडतात असे निरिक्षण स्थानिक शेतकर्‍यांनी नोंदवला.