पेणमध्ये बालकांना केले चुकीचे लसीकरण!

04 Aug 2023 14:23:05
dosh
 
अलिबाग । बालकांचे चुकीचे लसीकरण करणार्‍या जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील 2 आरोग्य सहाय्यक व एक आरोग्य सेवक यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. 1 मे 2023 रोजी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 बालकांना गोवर रुबेला लस देणे आवश्यक असताना त्यांना तेथील आरोग्य कर्मचार्‍यांनी गोवर रुबेला लस न देता बी.सी.जी. लस दिल्याची घटना घडली होती. यानंतर संबंधित बालकांच्या शरीरावर जखमा होऊन त्यांना त्रास सहन करावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
 
याप्रकरणी आरोग्य सहाय्यक विकास पाटील, आरोग्य सहाय्यक प्रियांका म्हात्रे, आरोग्य सेवक कोमल पाटील यांच्याकडून कर्त्याव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले असून, या तिघांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी निलंबित केले आहे.
 
सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी मुख्यालयी उपस्थित असणे गरजेचे आहे. यापुढे मी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देणार असून, या भेटीवेळी जे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतील त्यांचेवर कारवाई करण्यात येईल. तसेच बालकांचे लसीकरण करण्यापूर्वी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित आरोग्य कर्मचार्‍यांना योग्य पर्यवेक्षण करावे.
- डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रियगड जिल्हा परिषद.
Powered By Sangraha 9.0