इरशालवाडीचे होणार चौकजवळ पुर्नवसन

22 Jul 2023 13:07:20
earshalvadi  
 
अलिबाग | इरशालवाडी येथील दरडग्रतांचा शोध सुरुच आहे. दुर्घटनेच्या दुसर्‍या दिवसापर्यंत मृतांचा आकडा २४ वर पोहचला आहे. १४३ जणं सुखरुप असूर्नीं अद्यापही ८१ नागरिकांचा शोध कार्य सुरु आहे. सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.
 
दरम्यान, इरशालवाडी पुर्नवसन चौकजवळ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी इशारालवाडी येथे घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत स्थानिक प्रांत जागेवर पोहचले दरडग्रस्त सर्व लोकांची सोय करण्यात येत आहे. त्यांना राहण्यासाठी जुन्या मुंबई महामार्गालगत तयारी झाली आहे. या ठिकाणी ३२ मोठे कंटेनर मागवण्यात आलेले आहेत. तेथे विज, पाण्याची सोय, २० बाथरुम आणि २० शौचालये उपलब्ध करण्यात आली आहेत. दरडग्रस्तांसाठी कपडे, धान्य व गृहपयोगी वस्तु देण्यात येत अहोत.
 
इर्शाळवाडी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी, निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावावर काळाने घाला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही स्थगित करण्यात आले आहे. आणि उद्या सकाळी त्याच वेळी त्याच ४ एनडीआरएफ टीमसह सुरू राहील. आज टीमने एकूण ६ मृतदेह बाहेर काढले ज्यात तीन पुरुष आणि तीन महिला आहेत.
 
इरशालवाडीचे होणार चौकजवळ पुर्नवसन :-
चौक येथील सर्व्हे २७ ही शासकीय जमीन आहे. या जागेवर इरसालवाडी पुर्नवसन
करण्यात येणार आहे. सीडकोला त्या ठिकाणी लोकांना कायमस्वरूपी घरं बांधण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
 
गावातील ३४ विद्यार्थी गावाबाहेर शिक्षण घेत आहेत :-
इरसालवाडीतील ३४ विद्यार्थी गावाबाहरे शिक्षणासाठी गेले होते. त्यामुळे हे सर्वजण सुखरुप असणार परंतू ते कुठे कुठे शिकत आहेत याचा शोध सुरु आहे. त्यांच्याकडून त्यांच्या घरच्यांची माहिती मिळू
शकणार आहे.
 
सद्यस्थिती....
गावातील कुटुंब संख्या ... ४६
लोकसंख्या राहत असलेली ... २२९
मृत्यूचा आकडा ... २४
जखमी लोकं ... ८
सापडलेली लोकं ... १०७
शोध सुरु असलेली लोकं ... ८१
 
मदतीचे हात :-
एनडीआरएफच्या ४ तुकड्या एकूण १०० जवान , टीडीआरएफ चे ८० जवान, इमॅजीका कंपनीचे ८२ कामगार तर सिडकोचे ४६० कामगार बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर चौक, वरोसे, खोपोली येथील ग्रामस्थ, वेगवेगळ्या एनजीओ, ट्रेकर ग्रूप मधून एकूण ९०० पेक्षा अधिक लोक बचावकार्यात सहभागी झाले आहेत. रात्रीच्यावेळी बचावकार्य चालू ठेवण्यासाठी फ्लूड लाईट्स लावण्यात आले आहेत. ५००० फूड पॅकेट्सचे वाटप करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0