कर्ज फेडण्यासाठी त्यांने मुर्त्या चोरल्या, विकण्याआधीच रेवदंडा पोलीसांच्या बेड्या पडल्या...थेरोंडा येथे खंडोबा मंदिरातील देव चोरी उघडकीस...

08 Jun 2023 20:44:14
revdanda teronda
 
रेवदंडा । थेरोंडा येथे खंडोबा मंदिरातील देव मुर्ती चोरी, तसेच मुंबईकर कुटूंबीयांच्या कुलदैवत मुर्त्यांची चोरी करणार्‍या चोरट्याला थेरोंडा आगलेची वाडी येथून रेवदंडा पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. लग्न व धंद्यासाठी घेतलेले कर्ज परत फेड करता येत नव्हती...पैसे मागणार्‍यांच्या फेर्‍या वाढल्या होत्या. त्यामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलीसांनी केलेल्या चौकशीत सांगितले आहे.
 
चौल दत्तमंदीरातील चांदीची आरास चोरीचे प्रकरण ताजे असतानाच, थेरोंडा येथे खंडोबा मंदिरातील देव मुर्ती चोरी, तसेच मुंबईकर कुटूंबीयांच्या कुलदैवत मुर्त्यांची चोरी झाल्याची घटना घडल्यामुंळे नागरीकांमधून संताप व्यक्त होत होता. या घटनेनंतर पोलीसांचीही झोप उडाली होती. त्यामुळे रेवदंडा पोलीस आणि स्थानिक अन्वेशन शाखेच्या चार टिम कामाला लागल्या होत्या. सर्व दुवे शोधले जात असतानाच, जवळच एक लिंक पोलीसांना लागली. थेरोंडा आगलेची वाडी येथे राहणारा महेश नंदकुमार चायनाखवा याच्या घरी काही महिन्यापासून दोन माणसं पैसे मागण्यासाठी येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलीसांना दिली.
 
therona devlatil murti
 
त्या अनुषंगाने महेश चायनाखवा याच्या हालचाली पोलीसांनी टिपण्यास सुरुवात केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असता कर्ज परतफेडी करीता चोरी केल्याची कबूली दिली. महेशने लग्न व व्यवसायाकरीता कर्ज घेतले होते. या कर्जाची परतफेड होत नसल्याने दोन इसम महेशकडे वारंवार कर्ज वसूली करीता येत असत. त्यामुळे त्याने या मुर्त्या चोरल्याचे पोलीसांना सांगितले. चोरलेला सर्वच्या सर्व माल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.
 
रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज पो.नि. देवीदास मुपडे, उपनिरिक्षक दिपक म्हशीलकर, सहा.फौज. अशोक पाटील, सहा.फौज. पी.डी. देसाई, पो.ह. दिनेश पिंपळे, पो.ह. अस्मिता म्हात्रे, पो.ह. सुषमा भोईर, पो.ना. राकेश मेहत्तर, पो.शिपाई मनोज दुम्हारे, पंजाब पोळे, व स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाचे पोसई साठे, पो.ह दबडे, पो.ह. चव्हाण पो.ह. हंबीर, पोलिस शिपाई लांबोटे, यांनी विशेष प्रयत्न पोलिस तपास कामी केले.
Powered By Sangraha 9.0