अलिबाग, चेंढरेच्या रस्त्यांची वाताहत

भुमिगत विजवाहीन्या... मशिनने डि्रलिंग ऐवजी खोदकामावर भर ; विज महावितरण आणि अलिबाग नगरपालीका प्रशासनाचे दुर्लक्ष

By Raigad Times    05-May-2023
Total Views |
Alibag chendre road
 
अलिबाग । अलिबाग भुमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करण्यासाठी ठेकेदाराने पैसे बचाव भुमीका घेतली आहे. त्यामुळे मशिन डि्रलिंग करून वीज वाहिन्या टाकण्यात्याऐवजी सरसकट रस्त्यांचे खोदकाम करून वीज वाहिन्या टाकण्याची कामे केली जात आहेत. या कामामुळे सध्या शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात वाताहत झाली आहे.
 
या खोदकामामुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. अलिबाग शहर तसेच संलि3/4त चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भागात भुमिगत विद्युत प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च होणार आहे.
 
या प्रकल्पामुळे चक्रीवादळ व अन्य प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी उपरी तारमार्ग (ओव्हरहेड वायर) तुटून , पोल कोसळून अनेक प्रकारे नुकसान व जीवित हानी होत असते. हे टाळण्यासाठी भुमिगत विद्युत प्रकल्प राबवण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या आर्थिक सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. लीना इन्फोटेक प्रकल्पासाठी कंत्राटदार कंपनीची नियुी करण्यात आली आहे. वास्तविक पाहता हे काम मशिन डि्रलींगने होणे अपेक्षित होते. मात्र खर्च वाचविण्यासाठी ठेकेदार कंपनीने सरसकट रस्ते खोदकाम करून भुमिगत वाहीन्या टाकण्यास सुरवात केली आहे. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी फिडर पिलर उभे केले जात आहेत. अरुंद रस्त्यांवर हे फिडर पिलर रस्त्यावर आले आहेत.
 
त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होणार आहेत. खोदाईमुळे ठिकठिकाणी पाण्याच्या पाईप लाईन तोडल्या जात आहेत. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने नागरीकांना पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. भुमिगतवाहिन्या टाकण्याचे काम पुर्ण झाल्यावर तातडीने रस्त्याचे खड्डे बुजवून त्याचे डांबरीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होतांना दिसत नाही. त्यामुळे एकूणच याकामाबाबत जनमानसात प्रचंड नाराजी आहे.
 
अलिबाग शहर, चेंढरे ग्रामपंचायत व वरसोली ग्रामपंचायतीचा काही भाग येथे हे भुमिगत केबलिंग केले जात आहे. तसेच अलिबाग शहरातील 22/22 के.व्ही. अलिबाग स्विचिंग स्टेशनचेही नुतनीकरण होणार आहे. या प्रकल्पात एकूण 27 कि.मी. लांबीची उच्चदाब वाहिनी व 45 कि.मी. लांबीची लघुदाब वाहिनी भुमिगत टाकली जाणार आहे. 7.9 चौ.कि.मी. परिसरात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यात एकूण 118 रोहित्र, 78 आरएमयु, यांचाही समावेश आहे. भुमिगत केबल टाकण्यासाठी ट्रॅचिंग व ट्रॅच लेस जमिनीत आडवे डि्रलिंग करणे या पद्धतीचा वापर होईल. केबल साठी जमिनीखाली 0.8 ते 1.2 मि. खोल खड्डा असेल तर रोहित्र जमिनीपासून 1.5 मिटरवर असतील. प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.
 
शहरातील विद्युत वाहिन्या भुमिगत करण्याचे काम सुरु झाले आहे. ज्यासाठी सध्या रस्ते मोठ्या प्रमाणात खोदण्यात आले आहेत. खोदलेले रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश संबधित ठेकेदाराला दिले आहेत.
- एस. सी. इनामदार, कार्यकारी अभियंता, महावितरण अलिबाग
...........................................
 महावितरणच्या ठेकेदाराने शहरातील रस्ते तातडीने पुर्ववत करुन देणे अपेक्षित आहे. मात्र रस्ते दुरुस्ती यो1/2य प्रकारे केली जात नाही ही वस्तुस्थिती आहे. त्या संदर्भात महावितरणला नगर परिषदेनी वेळोवेळी स्मरणपत्र दिली आहेत.
- अंगाई साळुंखे,मुख्याधिकारी, अलिबाग नगर परिषद
........................................