रायगड जिल्ह्यात महामार्गावर 22 ब्लॅक स्पॉट

24 तास वायूवेग पथके राहणार कार्यरत

By Raigad Times    05-May-2023
Total Views |
22 black spots on the highway in Raigad district
 
अलिबाग | महामार्गावर होणारे अपघात 24 तास वायूवेग पथके राहणार कार्यरत टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना सुरु केल्या आहेत. यासाठी केलेल्या एका सर्व्हेत रायगड जिल्ह्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर 22 ब्लॅक स्पॉटस् क्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. याठिकाणी आयटीएमएस (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम) सह 24 तास सज्ज असलेले वायूवेग पथक मदतीसाठी ठेवण्यात येणार आहे.
...............................
 
रायगड जिल्ह्यातील एक ए3सप्रेस वे,
दोन महामार्ग जातात. या मार्गावर मोठ्याप्रमाणात अपघात होत असतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा गांभिर्याने घेतला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अख्यत्यारित असलेल्या 18 ब्लॅक स्पॉटस, राज्य महामार्ग यांच्या अख्यत्यारित असलेल्या रस्त्यावरील 2 ब्लॅक स्पॉटस व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अख्यत्यारित असलेले 2 ब्लॅक स्पॉटस ठरवण्यात आले आहेत. परिवहन विभाग, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत तातडीने संयुे पाहणी करुन ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्याकरिता तात्काळ व दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत.
 
वायूवेग पथक 24 तास तैनात
अनेकवेला वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवीत असतात. अशा वाहनचालकांच्या अरेरावीमुळे महामार्गावर होणार्‍या अपघातांची संख्या जास्त आहे. असे अपघात टाळण्यासाठी पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व पुणे-मुंबई जुना महामार्ग तसेच अन्य महामागारवरील रस्ते अपघात कमी करण्यासाठी 24 तास वायूवेग पथक कार्यरत ठेवण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.
 
नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना होणार दंड
या पथकामार्फत विना हेल्मेट, विना सिटबेल्ट, लेन कटिंग, ओव्हरस्पीडींग, प्रखर दिवे, मोबाईलवर संभाषण करीत वाहन चालविणे, कर्णकर्कश हॉर्न, रिफ्लेक्टर्स, ब्रेक लाईटस2 व्यवस्थित नसणे, अशा अनेक चुकीच्या बाबींसाठी वाहनचालकावर यो1/2य ती कायदेशीर कारवाई करावी. महामार्गावरील पेट ्रोल पंप, हॉटेल्स यांनी रस्त्यावर अवैधरित्या रस्ता दुभाजक बनविलेले असून त्यामुळेही अपघात होण्याची शक्यता असते, यासाठी महामार्गावरील रस्ता दुभाजक बंद करण्याची करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
 
माणगाव येथे फिटनेस ट्रॅक
मुंबई-गोवा महामार्गावरुन अवजड वाहने मोठ्या प्रमाणात जात असतात. जेएनपीटी, दिघी-आगरदंडा बंदरात उतरलेला माल ही वाहने घेऊन जात असतात. अनेकवेळा ही वाहने नादुस्त असतात, त्याच स्थितीत ती चालवल्याने अपघात घडण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यासाठी रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील वाहन मालकांच्या सोयीकरिता माणगाव येथे फिटनेस ट्रॅक उभारण्याबाबत आवश्यक ते नियोजन करावे, असेही सुनिल तटकरे यांनी सुचना केल्या.
 
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर
इंटेलिजंट सिस्टीमसाठी सर्व्हे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या 94 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 हजार वाहने धावतात. या रस्त्यावर वेगाची मर्यादाही निश्चित करण्यात आली असून कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. हा संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नियंत्रणाखाली असेल. स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम 39 ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यासह मुंबई-पुणे महामार्गावर आयटीएमएस बसवण्यासाठीही सर्व्हे करण्यात येणार आहे.
 
होणार्‍या उपाययोजना
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर इंटेलिजंट सिस्टीमसाठी सर्व्हे मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या 94 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरून दररोज सुमारे 60 हजार वाहने धावतात. या रस्त्यावर वेगाची मर्यादाही निश्चित करण्यात आली असून कडक नियमही लागू करण्यात आले आहेत. हा संपूर्ण रस्ता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या नियंत्रणाखाली असेल. स्पीड डिटेक्शन सिस्टीम आणि लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम 39 ठिकाणी बसवण्यात येणार आहे. यासह मुंबई-पुणे महामार्गावर आयटीएमएस बसवण्यासाठीही सर्व्हे करण्यात येणार आहे.