पेण हमरपुर येथे अपघात, पत्नीचा मृत्यू, पती जखमी

By Raigad Times    03-May-2023
Total Views |
pen hamrapur accident
 
पेण | मुंबई गोवा महामार्गावर पेण नजिक हमरापूर फाटा ब्रीजवर पहाटे 4:15am वा.अपघात एच. पी. गॅस ट्रक क्र.MH 12 EQ 2208 व महिंद्रा बोलेरो पिकअप क्र.MH 07 AJ 2682 मध्ये अपघात...
 
देवगडवरून मुंबईला आंबे घेऊन जात असताना एच. पी. गॅस ट्रकला मागून जोरदार टक्कर दिल्याने महिंद्रा बोलेरो पिकअप मधील सुमित चंद्रकांत खवळे वय 28 रा.देवगड सिंधुदुर्ग हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय 24 रा.देवगड सिंधुदुर्ग ही जागीच ठार...
 
अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकांत अडकून असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प...
अपघात झाल्याचे कळताच अपघातग्रस्तांचेवाली देवदूत कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
 
दादर सागरी पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.