भयानक ! मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट

महाड-आंबिवली येथील सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी

By Raigad Times    29-May-2023
Total Views |
mahad
 
महाड | मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन एक सहा वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक 27 मे रोजी दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील आंबीवली गावात घडली.
 
अनिता दिनेश वाघमारे वय वर्ष 6 असे या मुलीचे नाव असून या स्फोटात तिच्या तोंडाला व जबड्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने तिला जखमी अवस्थेत तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
 
लहान मुलांमध्ये दिवसेंदिवस मोबाईलचा अतिवापर वाढला असून मोबाईलच्या आहारी जाण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. या घटनेमुळे पालक वर्गात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.