जय श्रीरामचे नारे सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट वरून निर्माण झाला होता वांदग

श्रीरामावरून नेरळ मध्ये तरुणांची गर्दी..

By Raigad Times    21-May-2023
Total Views |
social media karajt jay shree nare
 
कर्जत | नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणाने हिंदूंचा देव म्हणून सर्वांचे मनात श्रध्देचा भाग म्हणून महत्वाचे स्थान असलेल्या प्रभू श्रीराम यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता. त्याबद्दल संबंधित तरुणाला रिक्षा चालकाने पकडून नेरळ पोलीस ठाणे येथे आणले त्यावेळीं नेरळ गाव आणि परिसरातील शेकडो तरुण हे पोलीस ठाण्यामध्ये जमले होते. दरम्यान, 19 मे ची रात्र नेरळ गाव जय श्रीराम च्या नाऱ्यांनी दुमदुमले, मात्र त्या तरुणाच्या विरूध्द नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
 
ममदापूर गावातील रिक्षाचालक विशाल हिसागले यांचे सोशल मोडियावरील इंस्टाग्राम वर अकाउंट आहे. त्यावेळी विशाल हिसालगे हे 19 मे रोजी दुपारी तीन वाजता आपले सोशल मीडिया अकाउंट तपासात असताना त्यांना जय भीम लव्हर 3582 या अकाउंट वरून प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर त्या व्हिडीओ वर असंख्य कमेंट आल्या होत्या आणि बघून अनेक लोक आपल्या हिंदूंच्या देवता असलेले प्रभू श्रीराम यांना चुकीच्या पध्यातीने कमेंट येत होत्या. शेवटी विशाल हिसाळगे यांनी आपले मित्र प्रथमेश घाटे, निखिल हजारे, ओमकार तरे आदी सह अनेक तरुणांच्या कानावर हो बाब सांगितली. त्यानंतर सर्व मुलांनी सदर प्रकरणी इंस्टाग्राम वरील पोस्ट करणारा तरुण याचा शोध घेण्यासाठी सायंकाळी सात वाजता कोल्हारे साई मंदिर येथे जमण्यास सांगितले. त्यावेळी त्या ठिकाणी दोनशेहून अधिक तरुण साई मंदिर येथे जमले असता जय भीम लव्हर 3582 हे अकाउंट किशोर सदाशिव जाधव या तरुणाचे असून तो तरुण बोपेले येथील एका इमारतीत राहत असल्याची माहिती इंस्टाग्राम वरील अकाउंट पाहिले असता स्पष्ट झाले होते.
 
त्यामुळें ते सर्व तरुण साई मंदिर बोपेले रस्त्यावरील अभिषेक फ्लोरिडा या इमारतीत पोहचले. त्या ठिकाणी तेथे जावून किशोर जाधव यांची चौकशी केली असता ती पोस्ट आपणच टाकली असल्याचे मान्य केले. त्यामुळे विशाल हिसलगे आणि अन्य तरुणांनी किशोर जाधव यास रिक्षामध्ये बसवून नेरळ पोलीस ठाणे येथे आणले. किशोर जाधव यांना नेरळ पोलीस ठाणे येथे आणले जात असताना किमान 200 दुचाकी या अभिषेक फ्लोरिडा अपार्टमेंट पासून नेरळ पोलीस ठाणे या मार्गात हॉर्न वाजवत जात होत्या. त्यावेळी जय श्रीरामाचे नारे देत होते. त्यामुळे नेरळ गावात रात्री साडे नऊ ते अकरा या वेळेत प्रचंड गोंधळ सुरू असल्याचे दिसून येत होते. शेवटी नेरळ पोलीस ठाणे येथे गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी सर्वांना पोलीस ठाण्यातून बाहेर काढले आणि गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली.
 
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास विशाल हीसाळगे यांनी किशोर सदाशिव जाधव याच्यावर प्रभू श्रीराम यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधाने सोशल मीडियावर प्रसारित केल्याबद्दल तक्रार दिली.त्या तक्रारी नुसार नेरळ पोलिसांनी हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 132अ, 295अ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात कर्जत तालुक्यातील वारे गावातील मूळ रहिवाशी आणि सध्या बोपले येथील अभिषेक फ्लोरिडा येथे राहणारा किशोर जाधव यास अटक केली आहे.
नेरळ गावात तरुणांची गर्दी...
हा प्रकार सायंकाळी उघडकीस आल्यावर नेरळ गाव आणि परिसरातील शेकडो तरुण जय श्रीरामाचे नारे देत जमले होते. त्याचवेळी शेकडो तरुण जमलेले असल्याने रात्री दोन तीन तास नेरळ गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता.