रायगड पोलीस भरतीमधील पात्र महिला उमेदवारांकडून घेतले पैसे; अलिबाग पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल

५ जणी कडून जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने घेतले २१ हजार ५०० रुपये

By Raigad Times    17-May-2023
Total Views |
Alibag raigad police station
 
अलिबाग | रायगड पोलीस दलात भरती पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी तपासणी प्रक्रिया सुरू असताना उमेदवाराकडून जिल्हा सामान्य रुग्णालयात पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
१५ महिला उमेदवाराकडून २१ हजार ५०० रुपये जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील आरोपी प्रदीप ढोबळ याने घेतले आहेत. याबाबत सोमवारी रात्री उशिरा ढोबळ यांच्या विरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ढोबळ याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून कोणाची 'मान' अटकणार हे तपासात निष्पन्न होणार आहे.
 
पोलीस भरती ही पारदर्शक व्हावी यासाठी सर्व खबरदारी पोलीस प्रशासनाने पहिल्यापासून घेतली होती. भरती साठी कोणीही पैसे देऊ नये, फसवणुकीला बळी पडू नये असे आवाहन रायगडपोलिसांकडून केले होते. त्यामुळे मैदानी, लेखी परीक्षेत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पोलीस भरतीमधील पात्र उमेदवाराच्या वैद्यकीय तपासणीमध्ये मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांने घोळ घातला. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, अलिबाग पोलीस ठाण्याचे सपोनी दत्तात्रय जाधव यावेळी उपस्थित