अलिबाग ठिकरूळ नाक्यावर आग, अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात

By Raigad Times    06-Apr-2023
Total Views |

Alibag Fire
अलिबाग |अलिबाग ठिकरूळ नाक्यावरील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या दुकानांमध्ये अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी प्रथम अलिबाग नगरपालिका अग्निशमन यंत्रणेला खबर दिली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, काँग्रेस नेते ऍड.प्रवीण ठाकूर, हर्षल पाटील हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.