म्हसळा-तळेगाव रस्त्यावर दुचाकीस्वाराला अज्ञात चोरट्यांनी लुटले!

03 Apr 2023 13:25:48
Mangaon news
 
माणगाव । म्हसळा-तळेगाव रस्त्यावर मोर्बा गावच्या हद्दीत भरदिवसा नंबर नसलेल्या पांढर्‍या रंगाच्या स्विफ्ट कार मधून आलेल्या 25 ते 30 वयोगटातील अज्ञात इसमांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट कार आडवी घालून स्कुटी चालकाला लुटून त्याच्या बॅगेतील साडे पाच लाख रुपयांची रोकड चोरून सदरचे अज्ञात चोरटे पसार झाले आहेत.
 
शुक्रवार 31 मार्च रोजी सायंकाळीच्या दरम्यान घडली. स्कुटी चालक प्रथम प्रभाकर पारवे (वय-21) रा. चिंचवली वाडी- गोरेगाव यांने याबाबतची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिली आहे..
 
प्रथम प्रभाकर पारवे हे स्कुटी गाडीने म्हसळाकडून तळेगावकडे जात होते. त्यांची गाडी मोर्बा गावच्या हद्दीत आल्यावर त्यांच्या गाडीच्या मागून एक नंबर प्लेट नसलेली पांढर्‍या रंगाची मारुती स्विफ्ट गाडीने ओव्हरटेक करुन आडवी घातली. आणि 5 लाख 57 हजार 349 रुपयांची रोकड चोरून अनोळखी तीन चोरटे इसम फरार झाले आहेत.
 
या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात भादंवि संहिता कलम 341, 392, 34 अन्वये दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव स्वामी व पोलीस निरीक्षक माणगाव राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश आस्वर हे करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0