सोशल मिडियाद्वारे लव्ह, लोचा,...आणि पोलीस कोठडी

26 Apr 2023 11:55:30
panvel love locha police custody
 
पनवेल । पनवेल मधील एका शिक्षिकेसोबत सोशल मीडियावरून मैत्री केल्यानंतर तिला लग्नाचेे आमिष दाखवून तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकारउघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी नाट्यमय रित्या सापळा रचून अटक केली आहे.
 
कृष्णा मेंगळ (वय 32, रा.अहमदनगर) याने वर्षभरापूर्वी पीडित शिक्षिकेशी सोशल मीडियावरून मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. याचदरम्यान, त्याने वेगवेगळ्या बहाण्याने तिच्याकडून तब्बल 11 लाख 80 हजारांची रक्कम उकळली.
 
पीडित शिक्षिकेशी लग्न करण्यास टाळाटाळ सुरू केल्यानंतर तिने आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्याने आपल्या मूळ गावी पलायन केले. त्यानंतर त्याने शिक्षिकेच्या मोबाइलवर वारंवार संपर्क साधून शिवीगाळ केली. तसेच मारण्याची धमकीही दिली. शिक्षिकेने पनवेल शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत पनवेल पोलीस तपास करीत असताना, सदर इसम करंजाडे येथील एका मेडिकल स्टोर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
 
 
Powered By Sangraha 9.0