अलिबागः जिल्हा रुग्णालयाच्या भुलतज्ञाविरोधात विनयभंगाची तक्रार

By Raigad Times    02-Apr-2023
Total Views |

alibag civil
 
अलिबाग । अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या भुलतज्ञाविरोधात एका महिलेने विनयभंगाची तक्रार केली आहे. बीपी मोजण्याच्या बहाण्याने छातीला हात लावल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
 
ताराबंदर, बोर्ली मांडला येथील एका महिलेची जिल्हा रुग्झाालात डिलीव्हरी झाली. यानंतर भुल देणार्‍या डॉक्टरांनी (अज्ञात) याने बी.पी मोजण्याच्या बहाण्याने फिर्यादी या महिलेच्या छातीला हात लावुन, अश्लील शब्दात बोलुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
 
याबाबत सदर महिलेने अलिबाग पोलीस ठाणे येथे तक्रार केली असून पोलीसांनी भा.दं.वि.क. 354 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास एस.डी.जाधव हे करीत आहेत.