पोलिस भरती करतो सांगून रोहा येथील तरुणाची फसवणूक

02 Apr 2023 19:44:18
fraud
 
अलिबाग । रायगड पोलिसात भरती करतो असे आमिष दाखवून रोहा तालुक्यातील धाटाव येथील तरुणाची 1 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत रोहा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आले आहे.
 
धाटाव येथे राहणार्‍या मुलाला रायगड पोलीस भरती करण्याचे आमिष दाखवून वडखळ कारावी येथील एका इसमाने 7 लाख रूपये मागणी केली होती. पोलीस भरती होता येईल म्हणून फिर्यादी यांने पैसे देण्यास मान्य केले होते.
 
त्यानुसार सुरुवातील एक लाख रुपये घेवून फिर्यादी यांचा भाऊ, पुतण्या आणि मुलगा हे तिनजण भेटण्यासाठी कारावी येथे गेले व मागणी केलेल्या 7 लाख रूपयांपैकी 1 लाख रूपये सदर इसमास दिले.
 
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फियादी यांनी वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर रोहा पोलीस ठाणे येथे भा.दं.वि.क. 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर इसमार अटक करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0