अलिबाग-वडखळ रस्त्याचे रुंदीकरण होणार

19 Apr 2023 13:44:25
Alibag Rastyache Rundikaran
 
अलिबाग | अलिबागकरांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या वडखळ ते अलिबाग रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. या महामार्गावर होणारा ट्राफिक टाळण्यासाठी हे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्त्याचा अंतिम डीपीआर तयार होताच निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती शेकापनेते आ. जयंत पाटील यांनी दिली. त्यांनी आज अधिकार्‍यांसोबत राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली.
 
वडखळ ते अलिबाग रस्त्याचे चौपदरीकरण होणार होते. त्याचा आराखडा, अंदाजीत खर्च आणि १५ मिनिटात वडखळची स्वप्नेदेखील दाखवण्यात आली होती. आ. जयंत पाटील यांच्या मागणीनुसारच हा रस्ता होत असल्याचे त्यावेळी नितिन गडकरी यांना सांगितले होते. प्रत्यक्षात भूसंपादनासह अनेक अडथळे आल्याने चौपदरीकरणाचे काम सुरु झालेच नाही. आता पुन्हा एकदा आ. जयंत पाटील यांनी वडखळ ते अलिबाग या रस्त्यासाठी पाठपुराव केल्याचे म्हटले आहे. आता रस्त्याच्या चौपदरीकरणाऐवजी रुंदीकरण करण्यात येणार आहे.
 
त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी साडे नऊ वाजता आ.जयंत पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यासह धरमतर येथील रस्त्याची व पुलाची पाहणी केली. तसेच शहाबाज, पांडवादेवी, पोयनाड या ठिकाणातील स्थानिक शेतकर्‍यांचीही मते जाणून घेतली. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी उपस्थित होते.
 
पुलाचे चौपदरीकरण धरमतर येथून रेल्वे मार्ग आणि जुना पूल यांच्यामध्ये असणार्‍या जागेतून पुलाचे काम होणार आहे. भविष्याचा विचार करून जरी रस्ता दुपदरी असला तरी पुलाचे काम हे चौपदरी करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी लक्ष्मीकांत जाधव व पराग गोसावी यांच्या समवेत चर्चा करून पुलाचे काम कशाप्रकारचे होईल, याबाबत आ. जयंत पाटील यांनी पूर्ण माहिती घेतली
 
वडखळ ते अलिबाग हा रस्ता चौपरदरी केला होता. आता भूसंपादनाचा प्रश्न निर्माण  झाल्यामुळे आणि लोकांनी जि’न देण्यासाठी विरोध केल्याळे आता हा रस्ता दुपदरी होणार आहे. साडेतीन मीटर एका बाजूला, साडेतीन मीट दूसर्‍या बाजूला असा वाढवून हा रस्ता होणार आहे. या मर्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सात स्पॉट काढण्यात आले आहेत. डिपीआर पूर्ण झाला की पंधरा ते वीस दिवसांत निविदा काढण्यात येईल. यानंतर सध्या होणार्या खडतर प्रवासाच्या त्रासातून अलिबागकरांची सुटका होणार आहे. 
- आ. जयंत पाटील, सरचिटणीस, शेकाप
Powered By Sangraha 9.0