पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर

By Raigad Times    29-Mar-2023
Total Views |
Pen Car Accident
 
पेण । पेण -खोपोलीमार्गावर मंगळवारी (28 मार्च) झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. अन्य जखमींना पेणमधील उपजिल्हा रु1/2णालयात दाखल करण्यात आले आहेत.
 
पेण तालुक्यातील सावरसई येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार आणि स्कुटी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकी चालक संदीप शिर्के (वय 30) याचा जागीच मृत्यू झाला. स्कुटी खोपोलीच्या दिशेकडे चालले होते. तर व्हेंटो कार खोपोलीहून पेणकडे येत होते. पेण पूर्व विभागातील सावरसई गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती की त्यामध्ये दुचाकी चालक जागीच ठार
 
झाला. दुसरा अपघातही याच मार्गावर गागोदे गावच्या बस स्टॉप जवळ सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास दुसरा अपघात घडला. टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकी चालक मनोज पाटील (वय 37)याचा जागीच मृत्यू झाला. खोपोलीकडून दुचाकी पेणच्या दिशेने जात असताना खोपोली कडे जाणार्‍या टेम्पो यांच्या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी, तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
 
राजेंद्र जाधव यांनी तातडीने रुणवाहिकेतून अपघातग्रस्तांना पेणमधील उपजिल्हा रु1/2णालयात तातडीने दाखल केले. यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील आणि मंगेश दळवी यांनी तातडीने उपजिल्हा रु1/2णालयात भेट दिली. सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्टेशनला करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. पेण-खोपोली मार्गावर अनेक अपघात घडत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने व संबंधित अधिकार्‍यांनी मार्गावर गतिरोधक व दुभाजक लावावेत अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे ईशारा येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.