काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द!

25 Mar 2023 15:18:37
Rahul Gandhi  
 
मुंबई । काँग्रेसनेते राहुल गांधींना मोठा ध क्का बसला आहे. त्यांना लोकसभा सचिवालयाने खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे. ‘मोदी आडनाव’ बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे.
 
सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वषारची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी संपूर्ण मोदी आडनावाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले. त्यांना उच्च न्यायालयात अपील करता यावे, यासाठी न्यायालयाने 30 दिवसांचा वेळ दिला असला तरीशिक्षेला स्थगिती दिलेली नाही. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना जामीनहीदिला आहे.
 
राहुल गांधी यांनी 13 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकातील कोलार येथे निवडणूक रॅलीत वादग्रस्त वेव्य केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले होते, नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचे आडनाव एकसारखेच का आहे? सगळ्या चोरांची आडनावं मोदी का असतात?. या विधानाबाबत भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर सुरत सत्र न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. सर्व चोरांचे मोदी हे आडनाव आहे, असे म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप भाजप आमदाराने केला होता.
 
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात जोरदार घोषणाबाजी झाली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता देशभर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली. छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातील फोटो समोर आले आहेत.पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अशा अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकत्यारनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठं वादळ येण्याची शक्यता काँग्रेस नेत्यांनी व्ये केली आहे.
Powered By Sangraha 9.0