अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामावरून शिवसेना, भाजपमध्ये श्रेयवाद

By Raigad Times    24-Mar-2023
Total Views |
Alibag Roha Road  
 
अलिबाग | अलिबाग रोहा या बहुप्रतिक्षीत रस्त्याचे काम गुढीपाडव्या पासुन सुरू झाले मात्र या कामाच्या श्रेया वरून शिवसेना शिदेगट (शिंदेगट) अणि भाजपमध्ये ड ्रामा पहायला मिळत आहे. भाजपचे नेते दिलीप भोईर यांनी कामाच्या ठिकाणावरुन फोटो व्हायरल केल्यानंतर दुसर्‍या दिवसी शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी देखील पुन्हा नारळ फोडला. तसेच काल आले आणि नारळ फोडायला धावले अशी टिका भोईर यांच्यावर करण्यात आली 
 
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याहस्ते 2021 साली झाले होते. मात्र प्रत्यक्षात काम सुरु होण्यासाठी 2023 उजडले आहे. यादरम्यान दोन ठेकेदार पळून गेले. यातील अग्रवाल नावाच्या ठेकेदाराला सुमारे 18 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यांत आले होते. मात्र त्यांने थातूरमातूर खडडे भरले आणि पळून गेला. यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरुच ठेवला. यानंतर पुन्हा नवीन ठेकेदार नेमण्यात आला आहे. हा रस्ता चांगल्या दर्जाचा व्हावा यासाठी ज्या ठेकेदाराने अलिबाग-रेवस रस्त्याचे काम केले आहे त्याच ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.
 
गुढी पाढव्याला या ठेकेदारांने प्रत्येक्ष कामाला सुरुवातदेखील केली. मात्र भाजप जिल्हा उपाध्यक्ष दिलीप  भोईर यांच्या फोटोने श्रेयवादाला सुरुवात केली आहे. दिलीप भोईर यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली. त्या छायाचित्राला कॅप्शन देताना हे काम भोईर यांनीच सुरु केल्याचे भासवले गेले. त्यामुळे शिवसेना नेते चांगलेच चवताळले आहेत. या कामाशी दिलीप भोईर यांचा कोणताही सबंध नसताना ते हिरोगिरी  करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा प्रकारचा चोराटी काम करणार्‍यांचा, खोटारडेपणा कदापि खपवून घेतला जाणार नाही, अशी कडक प्रतिक्रिया मानसी दळवी यांनी व्यक्त केली आहे. स्वत: निधी आणावा व श्रेय घ्यावे.
 
अलिबाग मुरुड मतदार संघात मोठया प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या विकास कामांचा झंझावात पाहता, काही राजकीय मंडळी  पाठपुरावा केल्याचे नाटक करुन श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशी प्रतिक्रीया राजा केणी यांनी व्यक्त केली आहे.
 
गुरुवारी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राज केणी, ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे गुरुवार (दि. 23) रोजी पुन्हा भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत ठिकरे उपस्थित होते. हे काम निर्धारित वेळेत आणि चांगल्या दर्जाचे होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.
 
दरम्यान, दिलीप भोईर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. तर काम कोणीही करा, पण निट करा अशा प्रतिक्रिया अलिबागकरांकडून व्यक्त होत आहेत 
 
* अलिबाग-रोहा रस्त्याच्या कामाचे स्वरुप
* कामाची लांबी - 85/630 किलोमीटर
* निविदा र क्कम- 177.78 कोटी
* कामाचा कालावधी- 24 महिने