रायगड जिल्हा परिषदेचा 79 कोटी 20 लाखांचा अर्थसंकल्प

By Raigad Times    22-Mar-2023
Total Views |
RZP 
 
अलिबाग । रायगड जिल्हा परिषदेचा सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 79 कोटी 20 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 1 कोटी 42 लाख 15 हजार 500 रुपये शिलकीच्या या अर्थसंकल्पात 12 कोटी 45 लाख 34 हजार 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
 
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या दालनात सोमवारी (दि.20) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य लेखा वित्त अधिकारी भगवान घाडगे यांनी हा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याकडे सुपूर्द करीत सादर केला. यावेळी जिल्ह्यातील आर्थिक दृष्ट2या दुर्बळ घटक, महिला, शेतकरी, अपंग, आदिवासी तसेच मागासलेल्या समाजाच्या उन्नतीसाठी योजना, ऐतिहासिक वास्तूंचे जतन, जिल्हा परिषद मालकीच्या इमारती व जागांचे जतन तसेच जिल्हा परिषदेच्या योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपयरत प्राप्त करुन देऊन विकास साधण्याचा प्रयत्न अर्थ संकल्पाच्या माध्यमातून करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
2023/24 या वर्षासाठी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 6 कोटी 71 लाख 73 हजारांची तरतूद करण्यात आली असून, इमारती व दळणवळण 17 कोटी 78 लाख 24 हजार, पाटबंधारे 1 कोटी 27 लाख, सार्वजनिक आरो1/2य 1 कोटी 91 लाख 2 हजार, सार्वजनिक आरो1/2य आभियांत्रिकी 13 कोटी 15 लाख 17 हजार 200, कृषी 17 कोटी 70 लाख 6 हजार, पशुसंवर्धन 2 कोटी 73 लाख 3 हजार, जंगले 10 लाख, समाजकल्याण 12 कोटी, अपंगकल्यान 3 कोटी, सामूहिक विकास महिला व बालकल्याण 6 कोटी, संकीर्ण खाती 4 कोटी 2 लाख 63 हजार, संकीर्ण6 कोटी 42 लाख 66 हजार, निवृत्ती वेतन6 लाख, तसेच इतर खचारची तरतूद करण्यात आली आहे.
 
2022/23 चा अंतिम सुधारित अर्थसंकल्प 2022/23 चा अंतिम सुधारित 90 कोटी 79लाख 43 हजार 409 रुपये खर्चाचा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. मार्च 2022 मध्ये 2023/23 याआर्थिक वर्षासाठी 66 कोटी 75 लाख 66 हजार रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. या मूळ अर्थसंकल्पात 24 कोटी 3 लाख 77 हजार 409 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावेळी अतिरिे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, महिला व बालविकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक वरिष्ठ लेखाधिकारी प्रशांत जगताप, लेखाधिकारी प्रभाकर भोपी व अन्य अधिकारी उपस्थित होते.