चिंचोटी येथील मुलीवर तिन परप्रांतीयांकडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ;आराडाओरड ऐकूण ग्रामस्थांची धाव

20 Mar 2023 14:35:17
Gail Chinchoti Morchya
 
अलिबाग । चिंचोटी येथील एका मुलीवर तिन परप्रांतीयांनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणारे तिघेही, गेल कंपनीत कामाला असल्याचे कळल्यानंतर आज गावकर्‍यांनी गेल कंपनीसमोर धरणे धरली. त्यांनी कामबंद करण्याची मागणी करत कंपनीत जाणारी वाहने रोखून धरली. यावेळी भैया हटाव, बेटी बचाओ चे नारे देण्यात आले.
 
Gail Chinchoti Morchya 2
 
अलिबाग तालुक्यातील चीचोटी गावात राहणारी पिडीत महिला ही रोज कामानिमित्त वावे येथे पायी येऊन जाऊन करीत होती. शुक्रवारी 17 मार्च रोजी नेहमीप्रमाणे पिडीतही आपले काम आटोपून घरी जाण्यास पायी निघाली होती. सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास ती चींचोटी गावाच्या हद्दीत पोहचली. त्याचवेळी तिच्या पाळतीवर असणार्‍या तीन जणांनी काळोखाचा फायदा घेत, तिला उचलून बाजूच्या खेळाच्या मैदानाजवळ आड रानात नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

Gail Chinchoti Morchya 3 
 
यावेळी पिडीत ही बचावसाठी आरडाओरड करीत असल्याने तिचे तोंड दाबुन ठेवले. तसेच ओढणीने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. या सर्व गडबडीमुळे सदर तरुणीचा आवाज काही ग्रामस्थांनी ऐकल्याने तिकडे धाव घेतली. त्यामुळे आरोपी पळून गेले. ग्रामस्थांना घटनास्थळी फक्त चप्पल आढळून आले. त्यावरुन शोधाशोध केली असता वावे जवळ एक इसम विना चप्पल आढळून आला. त्याला याबाबत विचारणा केल्यानंतर तो थातून मातूर उत्तरे देवू लागला. मात्र ग्रामस्थांनी चोप दिल्यानंतर तो कबूल आला.

Gail Chinchoti Morchya 4 
 
मात्र ते ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे. गुन्ह्यातील तीनही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. दरम्यान, हे तिनही आरोपी उसर येथील गेल कंपनीत कामाला असल्याचे समजल्यानंतर आज ग्रामस्थांनी गेल कंपनीच्या गेटवर आंदोलन केले.
 
 
Powered By Sangraha 9.0