50 वर्षाच्या इसमाचा लहान मुलावर अत्याचार

20 Mar 2023 14:05:08
sudhagad Muk Morchya
 
सुधागड-पाली । सुधागड तालुक्यातील एका अल्पवयीन मुलावर पालीतील अब्दुल कबले हा 50 वर्षीय इसम अनैसर्गिक शारीरिक अत्याचार करत होता. ही बाब नुकतीच समोर आल्याने कबले याच्या विरोधात पाली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
sudhagad Alpavain Mulivar Atyachar
 
या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (ता.19) संपूर्ण सुधागड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्व हिंदू समाजाच्यावतीने पालीतून मूक मोर्चादेखील काढण्यात आला. हा मूक मोर्चा पाली शहरात बल्लाळेश्वर गणपती मंदिर ते तहसील कार्यालय येथून शिवस्मारक असा काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिक सहभागी झाले होते.

sudhagad Alpavain Mulivar Atyachar2  
 
पाली, परळी, पेडली या महत्वाच्या बाजारपेठा व इतर ठिकाणीदेखील कडकडीत बंद पाळण्यात आला. मुस्लीम समाजाकडून कारवाईची मागणी मुस्लीम समाजाच्यावतीने शनिवारी (ता.18) पाली पोलीस स्थानकात संबंधित इसमावर कठोर कारवाई करण्यात यावी, याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच पालीतून काढण्यात आलेल्या मूक मोर्चालादेखील मुस्लीम समाजाच्यावतीने पाठींबा दर्शविण्यात आला.
Powered By Sangraha 9.0