पनवेल : गुगल पे हॅक करून केली दोन लाखाची फसवणूक

By Raigad Times    18-Mar-2023
Total Views |
G-Pay Fraud
 
पनवेल | एका इसमाच्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ /- रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये घडली आहे.
 
दत्तात्रय शेडगे हे तळोजा औद्योगिक वसाहती मधील कंपनीत कामावर असताना त्यांना एका अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .