रायगड पोलीस कल्याण निधीकरीता बुधवारी अलिबागमध्ये सांस्कृतीक कार्यक्रम

13 Mar 2023 18:15:11
 raigad sp gharge
 
अलिबाग | रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्याकरीता बुधवारी ( दि. १५) सायंकाळी ६ वाजता अलिबाग येथे‘सागर तरंग’या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपस्थित होते.
 
रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस मुख्यालय अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. ८ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर रायगड पोलीस दलांतर्गत कल्याण निधीकरीता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
या कार्यक्रमामध्ये पुष्कर श्रोत्री, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, दत्तु मोरे, श्रमेश, प्रथमेश, मीरा जोशी, नवीन प्रभाकर आदी आघाडीचे मराठी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. संगीत, नाट्य, नृत्य आणि हास्याची मेजवानी या कार्यक्रमातून प्रेक्षकांना मिळणार आहे.
 
नागरीकांच्या मनोरंजना सोबतच पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करून त्यामधील प्राप्त रक्कमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या कुटूंबीयाकरीता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करणे हा सदर कार्यक्रम आयोजीत करण्यामागचा उद्देश , असल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.
 
कार्यक्रमाच्या तिकीटाकरीता रायगड जिल्हयातील नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधवा. रायगड जिल्ह्यातील जास्तितजास्त लोकांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी यावे असे आवाहन रायगड पोलीस अधीक्षक सहभाग सोमनाथ घार्गे व रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे हानी केले आहे.
Powered By Sangraha 9.0