तक्रार करणार्‍या महिलेला धडा शिकविण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

06 Feb 2023 17:40:40
Consume poison
 
कर्जत  |  नेरळ जवळील शेलू गाव परिसरातील बांधिवली येथील 39 वर्षीय महिलेणे आपल्याविरुद्ध फिर्याद दिलेली असल्याने आरोपी असलेल्या 38 वर्षीय व्यक्तीने त्या महिलेला धडा शिकविण्यासाठी नेरळ पोलीस ठाण्यात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलीस ठाण्यात आणून बसविले असता बाथरूम ला जाण्याच्या इराद्याने बाथरूम मध्ये जाऊन सोबत आणलेली विष प्राशन करून आथंत्याकरण्याचा प्रयत्न नेरळ पोलिसांच्या खबरदारीमुळे अयशस्वी ठरला.
 
नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील शेलू गावाच्या बांधिवली परिसरात राहणार्‍या 39 वर्षीय महिला त्यांना तेथील 38 वर्षीय दिलीप श्रीराम यादव हा आपल्या वागणुकीतुन त्यांना त्रास देत आहेत. अशी तक्रार करण्यासाठी त्या मुस्लिम महिला नेरळ 3 फेब्रुवारी रोजी नेरळ पोलीस ठाणे मध्ये पोहचल्या.त्यानंतर संबधीत तक्रारदार महिला या मुस्लिम धर्मीय आणि सामनेवाले हे हिंदू धर्मीय असल्याने नेरळ पोलीस हे शेलू येथे जाऊन दिलप यादव याला घेऊन नेरळ पोलीस ठाणे मध्ये पोहचले.तेथे समज देण्यासाठी कागदपत्र तयार केली जात असताना आपल्याविरुद्ध पोलिसात तक्रार देणार्‍या महिलेला धडा शिकविण्यासाठी दिलीप यादव याने प्लॅन केला. त्याने आपल्यासोबत विष असलेली बाटली आणली होती आणि बाथरूम मध्ये जाऊन ते विष प्राशन करण्यासाठी बाथरूम ला जाण्याचा बहाणा केला.त्यानंतर बाथरूम मध्ये विष प्राशन करून बाहेर आलेला 38 वर्षीय तरुण खाली पडल्यानंतर हा प्रकार नेरळ पोल्सीणच्या लक्षात आला.
 
त्यानंतर नेरळ पोलिसांनी तात्काळ त्या तरुणाला उचलून नेरळ गावातील धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तेथे प्राथमिक उपचार करून विष प्राशन केलेल्या यादव ची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्याला उल्हासनगर येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले. मात्र तेथे देखील प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने शेवटी मुंबई येथील सायन हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले.त्यानंतर त्याची तब्बेत सुधारल्यानंतर नेरळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बी टी धायगुडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे हे अधिक तपास करीत आहेत. याबाबत नेरळ पोलीस ठाणे गु.र.नं. 27/2023 भा.दं.वि.क. 309 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यातआला आहे.
Powered By Sangraha 9.0